मुंबई : भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे आजपासून दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर आहेत. ते लडाखमध्ये दाखल झाले आहेत. लडाखमध्ये पुन्हा उफाळलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा लडाख दौरा महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात ते चीन सीमेलगतच्या सुरक्षेचा आढावा घेणार आहेत.


भारताकडून बंदोबस्तात वाढ, चीन पुन्हा बिथरला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लष्कराची युद्धसज्जता आणि चीन सीमेलगत भारताने वाढवलेल्या सैन्य हालचालींची माहिती या दौऱ्यात त्यांना दिली जाईल. पँगाँग लेकच्या दक्षिण किनाऱ्यांवर २९ आणि ३० ऑगस्टला चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला. भारतीय सैन्य़ाने हा प्रयत्न हाणून पाडला. 



पूर्व लडाखमधील पँगाँग परिसरात प्रचंड तणावाची स्थिती आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहे. या भागातील नाजूक स्थिती लक्षात घेता, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे आज  लडाखमध्ये दाखल झाले.


पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्यावर सर्वाधिक तणाव आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून घुसखोरी करण्यात आली आहे. तसेच एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने त्यांचा डाव उधळून लावला.


मागील तीन दिवसांपासून दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांध्ये चर्चा सुरु आहेत. मात्र, या सर्व चर्चा आतापर्यंत निष्फळ ठरल्या आहेत. चीन पँगाँग टीएसओ भागातून मागे हटायला तयार नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.