Army Chopper Crashed: भारतीय लष्कराचं (Indian Army) हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) किश्तवर (Kishtwar) जिल्ह्यातील मारवाह तालुक्यात हेलिकॉप्टर (Helicopter) कोसळलं आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं तेव्हा त्यामध्ये एकूण तीनजण होते. या दुर्घटनेनंतर पायलट आणि सह-पायलट यांना बाहेर काढण्यात आलं आहे. ते गंभीर जखमी झाले असल्याची प्रथामिक माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मारवाह येथील डोंगरावर हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती लष्कर अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत पायलट जखमी झाले असले तरी सुरक्षित आहेत. 


"जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडजवळ लष्कराचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. पायलट जखमी असले तरी ते सुरक्षित आहेत. पुढील माहिती मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत," असं लष्कर कर्मचाऱ्याने सांगितलं आहे.



मार्च महिन्यातही लष्कराचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. भारतीय लष्कराच्या चिता हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेत दोन पायलटचा मृत्यू झाला होता. अरुणाचल प्रदेशातील मंडाला हिल्स परिसरात ही दुर्घटना घडली होती.