श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये आज सकाळी लष्कराच्या चार जवानांनी सर्वोच्च बलिदान दिलं आहे. काल रात्री नियंत्रण रेषेवरून आठ दहशतवाद्यांनी घुसखोरीच्या प्रयत्नात होते. त्यावेळी राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी ही घुसखोरी रोखण्यासाठी गोळीबार केला. चकमकीत दोन दहशतवादी जागीच ठार झाले. तर चौघांनी पाकिस्तानाच्या हद्दीत पळ काढला. आणखी दोन दहशतवादी मारले गेल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे. अद्याप त्यांचे मृतदेह हाती लागलेले नाहीत.


पाकिस्तानी जवानांकडून फायरिंग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर जवानांनी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांच्यावर फायरिंग केली. फायरिंग करत ते भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. लष्कर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दहशतवादी घुसखोरी करत असतांना पाकिस्तानचे जवान त्यांना कव्हर फायरिंग देत घुसखोरी करण्य़ास मदत करत होते. हे दहशतवादी रात्री 1 वाजता घुसखोरीचा प्रयत्न करत होते. पाकिस्तानी जवानाकडून फायरिंग सुरु झाल्यानंतर भारतीय जवान अलर्ट झाले.


दोन्ही बाजुंनी जोरदार फायरिंग


दोन्ही बाजुंनी मोठ्या प्रमाणात फायरिंग सुरु होती. जवानांनी दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यापासून रोखलं. ज्यामध्ये 4 दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातलं. जवानांच्या फायरिंगनंतर 4 जवान पाकिस्तानात पळून गेल. पण भारतीय लष्कराचे एक मेजर आणि 3 जवान या कारवाई दरम्यान शहीद झाले.