कर्नल पुरोहितांच्या जामीन अर्जावरील निर्णय SCने राखून ठेवला
कर्नल प्रसाद पुरोहितांच्या जामीन अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. गेल्या नऊ वर्षांपासून पुरोहितांवर कोणतेही आरोपपत्र दाखल झालेले नाही. अदयाप तपास पूर्ण झालेला नाही, त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये असं एनआयएन म्हटले आहे.
नवी दिल्ली : कर्नल प्रसाद पुरोहितांच्या जामीन अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. गेल्या नऊ वर्षांपासून पुरोहितांवर कोणतेही आरोपपत्र दाखल झालेले नाही. अदयाप तपास पूर्ण झालेला नाही, त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये असं एनआयएन म्हटले आहे.
तर एटीएसने तपासात अनेक त्रृटी आहेत. मालेगाव स्फोटासाठी कर्नल पुरोहितांनी सामुग्री पुरवल्याचा गंभीर आरोप सिद्ध करण्यासाठी त्याचप्रमाणे पुरेसे पुरावेही तपास यंत्रणांकडे नाहीत असा युक्तीवाद आज पुरोहितांच्या बाजूने प्रसिद्ध वकील हरिश साळवे यांनी केला आहे.