श्रीनगर: काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेला जवान औरंगजेब याच्या कुटुंबीयांनी देशासमोर एका नवा आदर्श ठेवला आहे. गेल्यावर्षी ईद साजरी करण्यासाठी घरी निघालेल्या औरंगजेबचे दहशतवाद्यांनी पुलवामा येथून अपहरण केले होते. यानंतर दहशतवाद्यांनी त्याची हत्या केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहीद औरंगजेबच्या वडिलांचा मोदींना ७२ तासांचा अल्टीमेटम


या कटू प्रसंगानंतर एखाद्या कुटु्ंबाचा धीर खचला असता. मात्र, औरंगजेब यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे दोन्ही भाऊ सोमवारी भारतीय लष्करात दाखल झाले. 


शहीद जवान औरंगजेब यांचा मृत्युपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ


मोहम्मद तारीक आणि मोहम्मद शाबीर अशी त्यांची नावे आहेत. आज राजौरी येथे १०० नव्या जवानांना लष्करात सामावून घेण्यात आले. यामध्ये मोहम्मद तारीक आणि मोहम्मद शाबीर यांचाही समावेश होता. या सोहळ्याला औरंगजेब यांचे कुटुंबीय उपस्थित होते. आपल्या या देशप्रेमाने औरंगजेब यांच्या कुटुंबीयांनी संपूर्ण देशासमोर एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. 



औरंगजेब ४४ राष्ट्रीय रायफल्समध्ये कमांडो म्हणून सेवेत होता. शोपिया जिल्ह्यांत तो सेवा बजावत होता. ईदसाठी सुट्टी घेऊन तो घरी चालला होता. ही बाब हेरून दहशतवाद्यांनी त्याला लक्ष्य केले होते. यानंतर सरकारने शहीद राइफलमेन औरंगजेबला मरणोत्तर शौर्यचक्र पदक जाहीर केले होते.