शहीद जवान औरंगजेब यांचा मृत्युपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ आला समोर

शहीद जवान औरंगजेब यांच्या हत्येपूर्वीचा VIDEO 

Updated: Jun 16, 2018, 08:54 AM IST
शहीद जवान औरंगजेब यांचा मृत्युपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ आला समोर title=

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये भारतीय सैन्य दलाचा रायफलमॅन औरंगजेब यांचं अपहरण करुन हत्या केली. औरंगजेब यांचं दहशतवाद्यांनी अपहरण केल्यानंतर आणि हत्येपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ औरंगजेब यांच्या हत्येपूर्वीचा असल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओत औरंगजेब यांना दहशतवादी अनेक प्रश्न विचारत असल्याचं पहायला मिळत आहे. ॉ

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

दहशतवाद्यांनी औरंगजेब यांना एका झाडाखाली बसवलं आहे आणि त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करत आहेत. व्हिडिओत कुठल्याही दहशतवाद्याचा चेहरा दिसत नाहीये. मात्र, दहशतवाद्यांचा आवाज स्पष्ट ऐकायला येत आहे. या व्हिडिओत रायफलमॅन औरंगजेबला त्याच्या वडिलांचं नाव, घर, कुठल्या चकमकीत सहभागी होता असे अनेक प्रश्न दहशतवादी विचारत आहेत.

तु मेजर शुक्लाच्या टीममध्ये सहभागी होतास का? असा प्रश्नही दहशतवादी विचारत आहेत. मेजर शुक्ला यांच्या टीमने दहशतवादी समीर टायगर याचा खात्मा केला होता.

दहशतवाद्यांनी औरंगजेब यांना काय प्रश्न विचारले?

दहशतवादी - तुझं नाव काय आहे?

शहीद जवान औरंगजेब - औरंगजेब

 

दहशतवादी - वडिलांचं नाव?

शहीद जवान औरंगजेब - मोहम्मद हनीफ 

 

दहशतवादी - कुठे राहतो?

शहीद जवान औरंगजेब - पूंछ

 

दहशतवादी - ड्युटी कुठे असते?

शहीद जवान औरंगजेब - पुलवामा, पोस्टवर ड्युटी करतो

 

दहशतवादी - शुक्लाचा गार्ड आहे म्हणजे तु?, त्याच्यासोबत सिव्हिलमध्ये तुच येतोस ना?

शहीद जवान औरंगजेब - होय

 

दहशतवादी - मोहम्मद, वसीम आणि तल्हा भाई यांच्या एन्काऊंटरमध्ये तु सहभागी होतास ना?, तुच अंगावर जखमा केल्या होत्या?

शहीद जवान औरंगजेब - नाही, माझ्या हाताला लागलं होतं.

 

दहशतवादी - काय लागलं होतं?

शहीद जवान औरंगजेब - माझा हात तुटला होता

 

दहशतवादी - त्यांच्या शरीरावर जखमा कुणी केल्या होत्या?

शहीद जवान औरंगजेब - फायरिंगने झाल्या होत्या

 

दहशतवादी - तिघांच्या शरीरावर जखमा होत्या

शहीद जवान औरंगजेब - होय, फायरिंग केली होती

 

दहशतवादी - दहशतवादी शहीद झाल्यावर?

शहीद जवान औरंगजेब - होय