`भारतात परतल्यावर माल्ल्याची या जेलमध्ये रवानगी`
भारतात परतल्यावर माल्ल्या कोणत्या जेलमध्ये जाणार?
लंडन : विजय माल्ल्याला भारतात परत पाठवलं तर त्याची रवानगी आम्ही मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये करू, अशी माहिती भारतानं इंग्लंडमधल्या कोर्टाला दिली आहे. बँकांचं ९ हजार कोटींचं कर्ज बुडवून विजय माल्ल्या इंग्लंडला गेला आहे. माल्ल्याच्या प्रत्यर्पणासाठी भारतानं इंग्लंडच्या कोर्टामध्ये खटला दाखल केला आहे.
प्रत्येक कैदाल्या सुरक्षा देणं ही आमची जबाबदारी आहे आणि माल्ल्याच्या जीवाला धोका असल्याच्या बातम्या निराधार आहेत, असा दावा भारताकडून लंडनमधल्या वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात करण्यात येणार आहे.
भारतामधली जेल इतर देशांमधल्या जेलसारखीच आहेत आणि भारतात कैद्यांना योग्य अधिकार दिले जातात, असंही कोर्टात सांगण्यात येईल, अशी माहिती सरकारमधल्या सूत्रांनी पीटीआयला दिली आहे.
भारतामध्ये पाठवलं तर माल्ल्याच्या जीवाला धोका निर्माण होईल आणि भारतातल्या जेलमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन होईल, असा दावा माल्ल्याच्या वकिलांनी केला होता. माल्ल्याच्या प्रत्यर्पणाच्या खटल्याच्या सुनावणीला ४ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
माल्ल्यानं बुडवली या बँकांची कर्ज
बँकेचे नाव | कर्जाची रक्कम (दशलक्ष) |
एसबीआय | 1600 |
आयडीबीआय | 800 |
पीएनबी | 800 |
बँक ऑफ इंडिया | 650 |
बँक ऑफ बडोदा | 550 |
युनायटेड बँक ऑफ इंडिया | 430 |
मध्यवर्ती बँक | 410 |
युकॉन बँक | 320 |
कॉर्पोरेशन बँक | 310 |
स्टेट बँक ऑफ म्हैसूर | 150 |
इंडियन ओव्हरसीज बँक | 140 |
फेडरल बँक | 90 |
पंजाब अँड सिंध बँक | 60 |
अॅक्सिस बँक | 50 |
इतर बँका | 603 |
एकूण | 6963 कोटी |