नवी दिल्ली : पीएनबी गैरव्यवहाराबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अखेर मौन सोडले. रिझर्व्ह बॅंकेला अप्रत्यक्षपणे फटकारले. बँकिंग व्यवस्थेची फसवणूक करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही, असा इशारा जेटली यांनी दिलाय.


ऑडिटर्स काय करत आहेत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील सर्वात मोठ्या बँक गैरव्यवहारावर अखेर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मौन सोडलंय. ऑडिटर्स, बँक व्यवस्थापन आणि बँकांवर नियंत्रण असलेल्या प्रमुख संस्थांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. बँकिंग व्यवस्थेची फसवणूक करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही, असा इशाराही जेटली यांनी दिला. 'ऑडिटर्स काय करत आहेत?', असा थेट सवाल जेटली यांनी केला.


CAनी आत्मपरीक्षण करण्याची गरज


अंतर्गत आणि बाहेरचे ऑडिटर्स बँकेतील गैरव्यवहार पकडू शकणार नसतील तर चार्टर्ड अकाउंटंटनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे मला वाटते, असा चिमटा जेटली यांनी काढला. जेटली यांनी रिझर्व्ह बँकेलाही अप्रत्यक्षपणे फटकारले. बँकांतील अनियमितता पकडली जावी, यासाठी कोणत्या प्रकारची नवीन प्रणाली आणता येईल, याचा विचार पर्यवेक्षण करणाऱ्या संस्थांनी करण्याची गरज असल्याचे जेटली म्हणाले. 


जेटली यांचे प्रथमच मतप्रदर्शन 


दिल्लीत 'असोसिएशन ऑफ डेव्हलपिंग फायनान्सिंग इन्स्टिट्युशन इन एशिया अॅण्ड पॅसिफिक' या संस्थेच्या वार्षिक समारंभात जेटली बोलत होते. यावेळी बँकांतील कर्जघोटाळ्यांवर जेटली यांनी प्रथमच मतप्रदर्शन केले.