सिमेंट, टीव्ही, एसी आणखी होणार स्वस्त, अरुण जेटली यांनी दिले कपातीचे संकेत
आता पुन्हा एकदा काही वस्तू स्वस्त होण्याचे संकेत मिळत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तसे संकेत दिलेत.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आजपासून टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन स्वस्त करत सामान्यांना दिलासा दिला. जीएसटी कररचनेत इलेक्ट्रॉनिक उत्पादने २८ टक्क्यांच्या कक्षेत ठेवण्यात आली होती. आता काही इलेक्ट्रॉनिक उत्पादने १८ टक्क्यांच्या कक्षेत आली आहेत. फ्रिज, व्हॅक्युम क्लिनर्स, वॉशिंग मशिन या दैनंदिन घरगुती वापराच्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत. या कर कपातीनंतर आता पुन्हा एकदा काही वस्तू स्वस्त होण्याचे संकेत मिळत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तसे संकेत दिलेत.
आता सिमेंट, टीव्ही, एसी आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. याबाबत खुद्द केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीत कपातीचे संकेत दिले आहेत. जीएसटी परिषदेने मागच्या आठवडयात झालेल्या बैठकीत एकूण ८५ उत्पादनांवर कर कपात घोषित केली होती.
दरम्यान, टीव्ही, फ्रिज, व्हॅक्युम क्लिनर्स, वॉशिंग मशिन या दैनंदिन घरगुती वापराच्या वस्तू स्वस्त झाल्यामुळे याचा सरकारला तोटा सहन करावा लागणार आहे. या कर कपातीचा मध्यमवर्गीय ग्राहकांना फायदा होईल. मात्र, सरकारी तिजोरीला १६ हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे.
The GST rate reduction