नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली लवकर नॉर्थ ब्लॉकमधील अर्थखात्याच्या कार्यालयात परतणार आहेत. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे तब्बल तीन महिन्यांपासून जेटलींना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली आहे. या काळात अर्थखात्याचा हंगामी पदभार रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र, या काळातही जेटली व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अर्थखात्याच्या अनेक बैठकांना हजेरी लावत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, आता जेटलींची प्रकृती बऱ्यापैकी सुधारल्याने ते १५ तारखेनंतर आपल्या कार्यालयात परतण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर १४ मे रोजी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स) मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 


मोदी सरकार सत्तेत येताच २०१४मध्ये ही शस्त्रक्रिया झाली होती. मात्र त्यात गुंतागुंत उद्भवल्याने त्यांना तातडीने आयुर्विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात दाखल करावे लागले होते.