नवी दिल्ली : पाकिस्तानने सीमेपलीकडून केलेल्या गोळीबाराला भारताने उत्तर देत जम्मू आणि काश्मीर नियंत्रण रेशेवरील त्यांच्या पाच चौक्या उद्धवस्त केल्या, या कारवाईत पाक सैनिक मारले गेले. राजौरी आणि पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेपुढील पाकच्या पाच चौक्यांना गंभीर नुकसान पोहोचवले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. लादेनला मारलं जाऊ शकत तर काहीही होऊ शकत असे सूचक विधान अरूण जेटली यांनी पाकिस्तानला उद्देशून केले आहे. दशतवादाविरुद्ध कोणतीही कारवाई केली तर ती न्यायिक आहे हे अमेरिकेने दाखवलं आणि जगामध्ये कोणीही त्याला विरोध केला नाही. भारतही अशा प्रकराची कारवाई करु शकतो त्याला विरोध होण्याचे कारण नाही. भारताने केलेली कारवाई याचप्रकारची होती. जी कारवाई झाली ती पाक व्याप्त काश्मीरमध्ये झाली. अझर मसूदला आपण धडा शिकवू असा विश्वास तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या हवाई दलाची एफ १६ जातीच्या विमानांनी हवाई हद्दीचे उल्लंघन करीत बुधवारी सकाळी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. या विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश केल्यावर लगेचच भारतीय विमानांनी त्याला प्रत्युत्तर दिले आणि त्यांना परतावून लावले. यावेळी एफ १६ जातीचे एक विमान पाडण्यातही भारतीय हवाई दलाला यश आले. या विमानाच्या वैमानिकाचा पत्ता लागलेला नाही. पण भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याची पाकिस्तानची कृती त्यांना जास्तच महागात पडली आहे. आम्ही पण भारतीय हद्दीत घुसखोरी करू शकतो, हे दाखवण्यासाठीच आम्ही ही कृती केल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर भारताची दोन विमाने पाडल्याचा दावाही पाकिस्तानने केला. पण याला कोणताही दुजोरा मिळालेला नाही.


दरम्यान जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीनंतर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलंय. हे दहशतवादी जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचं समजतंय. सेना, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची संयुक्त टीम हे ऑपरेशन हाताळलं. सुरक्षा दलाकडून सध्या कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.