मुंबई: शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार विधानसभा निवडणुकीदरम्यान चांगलेच चर्चेत होते. पक्षाची चौकट सोडून लोकांमध्ये सहजपणे मिसळण्याच्या त्यांच्या स्वभावाचे अनेकांनी कौतुक केले होते. यानंतर आता आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी रोहित पवार यांना दिलेल्या शुभेच्छांमुळे ते पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'माझ्या लग्नासाठी अजितदादांनीच निभावली होती महत्त्वाची भूमिका'


काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी दिल्लीतील शाळांना भेट देतानाचा एक फोटो ट्विट केला होता. यावेळी त्यांनी दिल्ली सरकारच्या शैक्षणिक मॉडेलचे कौतुक केले होते. एवढेच नव्हे तर रोहित पवार यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासोबत सेल्फीही काढला होता. हे फोटो रोहित यांनी मंगळवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले होते. 


पराभवानंतर राम शिंदेंनी रोहित पवारांना विजयी फेटा बांधून जिंकलं अनेकांचं मन



रोहित पवार यांच्या ट्विटला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रिप्लाय दिला. या ट्विटमध्ये केजरीवाल यांनी म्हटले की, देशातील सर्व पक्ष आणि राज्ये जेव्हा एकमेकांकडून काही गोष्टी शिकायला सुरुवात करतील तेव्हा भारत खऱ्या अर्थाने विकसित होईल. देश बदलायचा असेल तर शिक्षण हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. रोहितजी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असे केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.