नवी दिल्ली : नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी नीती आयोगाची धुरा सुरुवातीपासून पेलणाऱ्या पानगढिया यांनी राजीनाम्याचं कुठलही स्पष्ट कारण दिलेलं नाही. पण ते ३१ ऑगस्टला पदावरून दूर होणार असल्याचं पानगढियांनी म्हटलंय. शैक्षणिक क्षेत्रात परतणार असल्याचं पानगढिया यांनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योजना आयोगाच्या ऐवजी नीती आयोग अस्तित्वात आल्यानंतर पानगढिया हे पहिले उपाध्यक्ष ठरले होते. देशाची नीती आणि विकास प्रक्रियेला नवी दिशा देण्यासाठी मोदी सरकारनं नीती आयोगाची सुरुवात केली होती. 


पानगढिया यांनी आपला हा निर्णय पंतप्रधान कार्यालयालाही कळवलाय. परंतु, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पानगढिया यांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर निर्णय घेण्यात आलेला नाही.


अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीत अभ्यास करणाऱ्या ६२ वर्षीय पानगढिया यांना अनुभवी अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखलं जातं. खुद्द पंतप्रधान मोदींनीच त्यांची निवड नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी केली होती.