आर्यन - अनन्याचे मेसेज लीक; खरंच WhatsApp चॅट खासगी राहीले आहेत का ?
आर्यन - अनन्याचे WhatsApp चॅट लीक झाल्यानंतर उपस्थित होत आहेत अनेक प्रश्न
मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मेसेजिंग ऍप व्हॉट्स ऍप प्रचंड लोकप्रिय आहे आणि जगभरात त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याच्या लोकप्रियतेचे एक मोठे कारण म्हणजे व्हॉट्सऍपची सुरक्षा आणि गोपनीयतेचे वैशिष्ट्ये. व्हॉट्सऍपचा दावा आहे की ऍपवरील प्रत्येक वापरकर्त्याचे चॅट्स एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड आहेत, याचा अर्थ कोणताही तिसरा व्यक्ती चॅट वाचू शकत नाही. पण असे असेल तर गेल्या दीड वर्षात बॉलीवूड स्टार्सचे चॅट कसे लीक होत आहेत? या मागे काय कारण आहे?
व्हॉट्सऍपचे 'एंड टू एंड एन्क्रिप्शन' काय आहे?
व्हॉट्सऍप आर्यन - अनन्याचे WhatsApp चॅट लीक झाल्यानंतर उपस्थित होत आहेत अनेक प्रश्न फिचरचा भरपूर उल्लेख करतो. कारण हे फिचर सेन्डर आणि रीसिव्हर शिवाय व्हॉट्सऍप चॅट्स कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला पाहण्याची परवानगी देत नाही. 'एंड-टू-एंड एन्क्रिप्शन' एक गोपनीयता वैशिष्ट्य आहे जे आपले चॅट सुरक्षित ठेवते.
'एंड-टू-एंड एन्क्रिप्शन' नंतर चॅट कशाप्रकारे लीक होत आहेत?
'एंड-टू-एंड' एन्क्रिप्शन नंतर चॅट लीक होणं अशक्य टास्क आहे. त्यामुळे प्रश्न उद्भवतो, की या सेलिब्रिटींचे चॅट कसे लीक झाले. महत्त्वाचं म्हणजे साधारणपणे चॅट्स लीक होत नाहीत, चॅट ऍक्सेस केल्या जातात. चॅट्स ऍक्सेस करण्यासाठी अधिकारी फक्त फोन अनलॉक करतात आणि नंतर WhatsApp उघडतात आणि चॅट्स पाहतात.
या बाबतीत भारतात कोणतेही कठोर कायदे नाहीत. यूएस सारख्या देशांमध्ये, एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला एखाद्या व्यक्तीच्या चॅटचं ऍक्सेस हवं असेल, तर त्यांना वॉरंटची आवश्यकता असते आणि त्यानंतरच ते चॅट पाहू शकतात. व्हॉट्सऍपच्या 'एंड-टू-एंड एन्क्रिप्शन' फीचरमध्ये कोणतीही धोका नाही आणि तुमचे चॅट सुरक्षित आहेत. पण सरकारी बाबींमध्ये तुमचे चॅट्स सहज उपलब्ध होऊ शकतात.
सध्या चर्चेत असलेलं प्रकरण शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं आहे जो ड्रग्सशी संबंधित आहे. याच प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेलाही आर्यन खानच्या गप्पांद्वारे बोलावले आहे.