चेन्नई: सध्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडल्यामुळे सामान्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. इतकेच काय पेट्रोल आणि डिझेल अनेकांसाठी जवळपास अप्राप्य झाल्याचे दिसत आहे. तामिळनाडूतील एका घटनेमुळे याचे प्रत्यंतर आले आहे. याठिकाणी एका लग्नात नवऱ्याच्या मित्रांनी त्याला भेट म्हणून चक्क पाच लीटर पेट्रोल दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तामिळनाडूतील एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, या लग्न समारंभात नवरदेवाच्या मित्रांनी पेट्रोलने भरलेला कॅन भेट म्हणून दिला. हे पाहून पाहुण्यांना हसू आवरत नव्हते. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


तामिळनाडूने पेट्रोलच्या दराने ८५.१५ रूपयांची पातळी गाठली आहे. देशातील अनेक राज्यांच्या तुलनेत हे दर जास्त आहेत. त्यामुळे आम्ही ही प्रतिकात्मक भेट दिल्याचे नवरदेवाच्या मित्रांनी सांगितले.