नवी दिल्ली : NIA संशोधित बिलावर सोमवारी लोकसभेत चर्चा सुरु होती. या दरम्यान मुंबईचे माजी कमिश्नर आणि भाजपचे खासदार सत्यपाल सिंह हे हैदराबाद स्फोटावर बोलत होते. सिंह यांना या प्रकरणावर बोलताना म्हटलं की, या स्फोटाच्या आरोपाखाली पोलिसांनी अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांना पकडलं तर मुख्यमंत्र्यांनी कमिश्नरांना असं करु नका नाहीतर तुमची नोकरी जाईल असं म्हटलं.' भाजप खासदार सिंह यांच्या या वक्तव्यानंतर औवैसी यांनी यावर आक्षेप घेतला. गृहमंत्री अमित शहा हे गृहमंत्री आहेत. देव नाहीत. अमित शहा हे बोट दाखवून धमकी देतात. असं देखील ओवैसींनी म्हटलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओवैसी साहेब ऐकून घेण्याची सवय लावा असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला आहे. तर यावर उत्तर देतांना मला भीती वाटते असं एमआयएमचे खासदार ओवैसी यांनी म्हटलं आहे. संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रीय तपास संस्थेच्या विधेयकाबाबत खासदार सत्यपाल सिंह बोलत होते. यावेळी ओवैसी सिंह त्यांना बोलू देत नव्हते. सभापतींच्या मध्यस्थीनंतरही ओवैसी थांबले नाही. त्यामुळे अमित शाह यांनी ओवैसींना ऐकून घेण्याची सवय लावा असा सल्ला दिला. तर यावर उत्तर देत भीती वाटते असं ओवैसींनी म्हटलं. त्यावर तुम्हाला भीती वाटत असेल तर त्याला आम्ही काय करू शकतो असं अमित शाह यांनी म्हटलं.