Asaduddin Owaisi On Gyanwapi Masjid Verdict : वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीतील बंद असलेल्या व्यासांच्या तळघरामध्ये हिंदू पक्षकारांना पूजा करण्याची अधिकार वाराणसी न्यायालयाने दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून यावर वाद सुरू होता. वास्तूच्या भोवती उभारण्यात आलेले बॅरिकेड्स काढून टाकण्याची प्रक्रिया सात दिवसांत पूर्ण केली जावी, असं न्यायाधीश डॉ.अजय कृष्ण विश्वेश यांनी बजावलं आहे. तळघरामध्ये 1993 पर्यंत पूजाअर्चा केली जात होत पण त्यानंतर मात्र ती थांबविण्यात आली, असा आरोप हिंदू पक्षकारांकडून करण्यात आला होता. अशातच आता या प्रकरणावर एआईएमआईएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले असदुद्दीन ओवैसी?


न्यायाधीश साहेबांच्या निवृत्तीचा आज शेवटचा दिवस होता. 17 जानेवारी रोजी रिसीव्हरची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा निकाल दिला. जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी या कृत्याबाबत मौन तोडत नाहीत, तोपर्यंत हे सर्व घडणार आहे, हे असंच सुरू राहणार आहे, असं असदुद्दीन ओवैसी म्हणतात. ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा करण्यास परवानगी देणं चुकीचं आहे. 1993 पासून तुम्ही स्वत: म्हणत आहात की तिथे काहीही होत नाही. अपीलसाठी 30 दिवसांचा अवधी द्यायचा होता, असं ओवैसी म्हणाले आहेत.


राम मंदिर प्रकरणाचा निर्णय आला तेव्हाच विश्वासाच्या आधारावर निर्णय दिल्याचे आम्ही त्यावेळीही सांगितलं होतं. आता या बाबी पुढंही सुरू राहतील. 6 डिसेंबर पुन्हा पुनरावृत्ती होऊ शकते... का होऊ शकत नाही? असा सवाल करत असदुद्दीन ओवैसी यांनी नाराजी व्यक्त केलीये.



दरम्यान, वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश आज सेवानिवृत्त होत आहेत. निवृत्तीच्या दिवशीच न्यायाधीशांनी ज्ञानवापी प्रकरणात मोठा निकाल दिला. तळघरात पूजेच्या अधिकाराबाबत 2016 मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता यावर वाराणसीचे जिल्हा न्यायालयाकडून निकाल देण्यात आला आहे.


ज्ञानवापी मशिदीच्या तळघरामध्ये नियमितपणे पूजा केली जाणार आहे. काशी विश्वनाथ ट्रस्ट बोर्डाच्यावतीने पूजा अर्चना केली जाणार आहे. हिंदू पक्षाचा हा मोठा विजय मानला जात आहे. मागील 30 वर्षाच्या न्यायालयीने संघर्षानंतर हिंदू पक्षाच्या बाजूने पहिल्यांदाच एवढा मोठा निकाल देण्यात आला आहे. नोव्हेंबर 1993 पर्यंत या ठिकाणी पूजा-अर्चना केली जात होती.