जोधपूर : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणी जोधपूरच्या विशेष न्यायालयाने आसाराम बापूंना दोषी ठरवलं आहे. आसाराम यांच्या व्यतिरिक्त इतर 2 आरोपींना ही कोर्टाने दोषी ठरवलं आहे. तर इतर 2 जणांची निर्दोष सुटका केली आहे. आसाराम यांच्यावर एससी-एसटी अॅक्ट आणि पॉक्सो अॅक्टसह 14 कलम लावण्यात आल्य़ा आहेत. आता आसाराम यांना किती वर्षांची शिक्षा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.


आसाराम दोषी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसाराम हे दोषी ठरणार हे कोर्टाच्या निर्णयाआधीच बोललं जात होतं. पीडितेने 27 दिवसाआधीच 94 पानांचा जबाब नोंदवला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पीडितेने एकदाही जबाब बदलला नाही. या प्रकरणात कृपालसिंह यांची हत्या झाली याचा आरोप देखील आसारामवर आहे. यानंतर अनेक साक्षीदारांवर हल्ले आणि हत्या झाली. याचा आरोप देखील आसारामवर आहे.


आसारामवर गंभीर आरोप...


भारतात श्रद्धा ही खूप मोठी गोष्ट आहे. हे प्रकरण देखील लोकांच्या आस्थेची जोडलेलं होतं. कारण आसारामचे लाखो अनुयायी आहेत. पण जेव्हा ज्या व्यक्तीकडे संरक्षण म्हणून मुलीला ठेवलं होतं त्याच मुलीवर अत्याचार केल्याने हे प्रकरण खूप गंभीर होतं. 


50 कोटी मागितल्याचा आरोप


या प्रकरणात 2008 मध्य़े कोर्टामध्ये आसारामच्या वकिलांना पीडितेच्या पित्याने 50 कोटी मागितल्याचा आरोप केला होता. पण ही गोष्ट ते कोर्टात सिद्ध करु शकले नव्हते. 


जेलमध्येच राहणार आसाराम!


आसारामच्या विरोधात पॉक्सो एक्ट 2012 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. जेव्हा गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा पीडितेचं वय 17 वर्ष होतं. यानंतर द क्रिमिनल लॉ अमेंडमेंट 2013 मध्ये बलात्कारासाठी 376 कलम लावण्यात आलं. या सगळ्या कलम अशा आहेत ज्यामध्ये कमीत कमी 10 वर्षांची शिक्षा होते. आणि काही प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा होते.