मुंबई : अशनीर ग्रोवर (Ashneer Grover)यांनी फिनटेक भारत पे च्या एमडी पदाचा राजिनामा दिला आहे. अशनीर ग्रोवर यांच्यावर चौकशी सुरू केल्याने त्यांनी फिनटेक प्लॅटफॉर्मविरोधात याचिका दाखल केली होती. 


राजिनाम्यानंतर अशनीर यांची प्रतिक्रिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिनटेक यूनिकॉर्नला पाठवलेल्या राजिनाम्यामध्ये अशनीर ग्रोवर यांनी लिहले की, त्यांच्याशी अपमानास्पद व्यवहार करण्यात आला. त्यांची बदनामी करण्यात आली. त्यांना कंपनीपासून दूर होण्यास भाग पाडण्यास आलं. 


अशनीर यांनी SIAC मध्ये दाखल केली याचिका


अशनीर ग्रोवर यांनी सिंगापूर आंतरराष्ट्रीय आर्बिट्रेशन सेंटर (SIAC)मध्ये मध्यस्थता करून याचिका दाखल केली. आपल्या याचिकेत अशनीर ग्रोवरने म्हटले की, त्यांच्याविरोधात मुद्दाम बेकायदेशीर चौकशी सुरू करण्यात आली आहे.


अशनीर यांची पत्नी माधुरी जैन ग्रोवरला त्यांच्या कार्यकाळादरम्यान, आर्थिक अनियमिततेमुळे फिनटेक फ्लॅटफॉर्म भारतपेमधून निलंबित करण्यात आले होते.


अल्वारेझ आणि मार्सल या आठवड्यात ग्रोव्हरच्या काळात फर्ममधील आर्थिक अनियमिततेबद्दल त्यांचा अहवाल सादर करणार आहेत.  भारतपेचे प्लॅटफॉर्मवर सध्या 8 दशलक्ष व्यापारी आहेत.