मुंबई : मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राचा सिंघम म्हणून एक चेहरा सातत्यानं सर्वांचं लक्ष वेधत आहे. रुबाबदार अंदाज असणारा हा चेहरा आहे आयपीएस वैभव निंबाळकर यांचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसाम- मिझोरम सीमावादावरुन (Assam-Mizoram Clash) प्रकरण इतकं पेटलं की, (Assam-Mizoram Clash ) मिझोरमच्या सीमाभागात असणाऱ्या लायलापूर भागात आसाम पोलीस विभागात काम करणारे 5 पोलीस जवान शहीद झाले. यामध्ये cachar जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक वैभव निंबाळकर (vaibhav nimbalkar) जखमी झाले. माध्यमांमध्ये हे वृत्त वाऱ्यासारखं पसरलं आणि कोणतंही नातं नसतानाही असंख्य जणांनी वैभव निंबाळकर यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या. 


Assam-Mizoram Clash :'दुर्दैवाने भारतीयांनीच त्याच्यावर गोळी झाडली.' सिंघमच्या कुटुंबियांची भावूक पोस्ट


वैभव निंबाळकर यांच्यासोबत नेमकं काय घडलं याची माहिती खुद्द त्यांची बहीण अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिनं दिली. ज्यानंतर आता वैभव यांच्या पत्नी अनुजा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी या परिस्थितीमध्ये आपल्या मदतीला धावून आलेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार मानले आहेत. मदत करणाऱ्यांचं आणि सदिच्छांचा आधार देणाऱ्यांचं प्रमाण इतकं आहे की कोणाचे आभार मानू हेच कळेनासं झालं आहे अशी निरागस भावना त्यांनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. 


अनुजा यांनी पोस्टमध्ये काय लिहिलं? 
'एका खासगी विमानानं मुंबईला आणलं गेलं. मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, तो शुद्धित आहे.', असं लिहित आभार मानण्यासाठीची यादी ही भलीमोठी असल्याची बाब अनुजा यांनी स्पष्ट केली. 




सनदी अधिकाऱी, आसामचे मुख्यमंत्री, भारतीय वायुदलासह असंख्य जणांचे आभार मानताना अनुजा यांना भावना अनावर झाल्या. नजरचुकीने कोणाचे आभार मानायचे राहून गेलं असलं तरीही त्यांनी आमच्यासाठी जे काही केलं त्यासाठी मी कृतज्ञ आहे अशीच भावना त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून मांडत या आव्हानाच्या काळातूनही आपण आयुष्याची नौका पुढे नेऊ असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.