मुंबई : सीमा वादावरून आसाम आणि मिझोरम यांच्यातील वादाने (Assam-Mizoram Clash ) हिंसक रूप घेतले. आसाम-मिझोरम बॉर्डरच्या लायलापुर परिसरात आसाम पोलिसांचे 5 जवान शहीद झाले. तर cachar जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर यांच्यासह 50 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
IPS अधिकारी वैभव निंबाळकर (IPS Vaibahv Nimbalkar) यांच्या डाव्या मांडीला गोळी लागली. त्यांच्यावर उपचार करून गोळी काढण्यात आली. पण या गोळीने महाराष्ट्राच्या सिंघमला मोठ्या प्रमाणात जखमी केलं आहे. त्या अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की, ते पाहून अंगावर काटा येईल. (मराठमोळा IPS वैभव निंबाळकर आसाम - मिझोरमच्या संघर्षात जखमी; नेमका तो वाद काय?)
IPS अधिकारी वैभव निंबाळकर यांची बहिण आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये IPS अधिकारी वैभव निंबाळकर यांच्या मांडीवर लागलेल्या गोळीचा परिणाम त्या पोस्टमध्ये शेअर केला आहे. IPS अधिकारी वैभव निंबाळकर यांच्या मांडीचा एक्स-रेचा फोटो आणि पोस्ट शेअर केली आहे.
उर्मिला निंबाळकरने पोस्टमध्ये लिहिलंय की,'ते आसामचे अधिकारी नाहीत, ते मिझोरमचे अधिकारी नाहीत, ते भारताचे अधिकारी आहेत. तो देशाचा अभिमान आहे. तो एक IPS अधिकारी आहे. तो गोळीबारात पुढे उभा राहिला पण दुर्दैवाने, इतर भारतीयांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. अजूनही काही असे म्हणत आहेत की फक्त गोळीबार करण्यात आला, तेथे अत्याधुनिक शस्त्रे नव्हती. बुलेटने भारताच्या हिरो, आसाम पोलिसांचे काचर एसपी, वैभव चंद्रकांत निंबाळकर यांचे काय केले ते पाहा. नायक तुला सलाम, लवकर बरे व्हा.' (Assam-Mizoram Border Dispute: महाराष्ट्राचे पोलीस अधिकारी जखमी, 6 पोलीस जवान शहीद)
IPS वैभव निंबाळकर यांच्या प्रकृतीकरता सोशल मीडियावरून प्रार्थना केली जात आहे. वैभव निंबाळकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. ऑपरेशनकरून गोळी बाहेर काढण्यात आली. आता IPS अधिकारी वैभव निंबाळकर यांना ICU मध्ये दाखल करण्यात आलं आहे. गोळीने त्यांच्या मांडीचं नेमकं काय केलंय? हे या पोस्टमधून देखील स्पष्ट होत आहे.
आसाम आणि मिझोरमची सामाईक सीमा 164 किलोमीटर आहे, मिझोरमचे एजवाल, कोलासिब, मामित आणि आसामच्या cachar, हेल कांडी आणि करीमगंज जिल्ह्यांची सामाईक सीमा आहे. सीमावर्ती भागातील गुटगुटी गावापासून हा वाद सुरू झाला. या गावात मिझोरमच्या पोलिसांनी काही तात्पुरते कॅप लावले होते.
आसाम पोलिसांचे म्हणणे आहे की, हे कॅप आसामच्या जमिनीवर आहेत. मिझोरमच्या पोलिसांचे म्हणणे आहे की, हा मिझोरमचा भाग आहे. यावरून झालेल्या वादादरम्यान दोन्ही पोलिसांमध्ये गोळीबार झाला. यामध्ये 6 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तसेच cachar चे पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर यांच्यासह 50 पोलिस कर्मचारी जखमी आहेत.
आसाम आणि मिझोरम दरम्यान, सुरू असलेला हा सीमा विवाद 146 वर्ष जुना आहे. 1875 साली इंग्रजांनी मिझोरम आणि आसाममध्ये cachar जिल्ह्यात सीमा निर्धारित केली होती. तेव्हा मिझोरम लुशाई हिल्स म्हटले जात होते.
या हिंसेत जखमी झालेले वैभव निंबाळकर मुळचे बारामतीचे असून त्यांचे शिक्षण पुणे येथे झाले आहे. पुण्यातूनच त्यांनी स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करून संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले होते. ते 2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत