ईव्हीएम घोळ टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने बदलला नियम
निवडणूक निकाल जाहीर करण्याचे नियम बदलल्याचे निवडणूकाने आयोगाने सांगितल आहे.
नवी दिल्ली : राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीससगढ, तेलंगणा आणि मिझोरम विधानसभेचा निकाल काही वेळातच सर्वांसमोर येईल. या राज्यांमध्ये वेगवेगळ्या तारखांना निवडणुका झाल्या. मागच्या काही निवडणूकीत ईव्हीएम मशिनमध्ये घोळ झाल्याचे प्रकार समोर आले. तसेच ईव्हीएम मशिनमध्ये जाणिवपूर्वक बदल केल्याचेही आरोप-प्रत्यारोप झाले. हे सर्व पाहता निवडणूक आयोगाने या मतमोजणी प्रक्रियेत महत्त्वाचे बदल केले आहेत. निवडणूक निकाल जाहीर करण्याचे नियम बदलल्याचे निवडणूकाने आयोगाने सांगितल आहे.
मध्य प्रदेश विधान निवडणूक मतमोजणी दरम्यान प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या मतदान केंद्रातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅड यांची तपासली जाईल. विधानसभा क्षेत्रातील एक मतदार केंद्र निवडला जाईल असे मुख्य निर्वाचन अधिकाऱ्यांनी सांगितले. या निवडलेल्या मतदान केंद्राच्या व्हीव्हीपॅडची पावती आणि ईव्हीएम कंट्रोल यूनिटमध्ये दिसणाऱ्या संख्येची पडताळणी केली जाईल.ईव्हीएम मशीनची काऊंटींग संपेपर्यंत ही प्रक्रिया होणार आहे. उमेदवार, निवडणूक अधिकारी तसेच केंद्रीय अधिकाऱ्याच्या समोर हे होणार आहे. या सर्वाची व्हिडिओग्राफी देखील केली जाणार आहे.
व्हीव्हीपॅडच्या पावतीने मताची सत्यता पडताळली जात आहे. बॅंकेत असणाऱ्या काऊंटींग बूथ प्रमाणेच मतमोजणी कक्षातील बूथ तयार गेलाय. सर्व उमेदवारांना यासंदर्भात पुर्व कल्पना देण्यात आली आहे. सफेद कागदावर सर्व मतदान केंद्रांचे नंबर लिहून चिठ्ठ्या एकत्र केल्या जातील. त्यातील एक चिठ्ठी उचलून मतदान केंद्र निवडले जाईल.