नवी दिल्ली :  राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीससगढ, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यातील निवडणूक निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. यातील काही राज्यांतून धक्कादायक निकाल येण्याची शक्यता  शेअर बाजारासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. शेअर बाजारात सोमवारपेक्षाही मंगळवारी अधिक घसरण पाहायला मिळणार असल्याचे मत जाणकार व्यक्त करत होते. दरम्यान, सेन्सेक्स 300 अंकानी कोसळल्याचे वृत्त समोर येत आहेत. शेअर बाजारात आज 'भूकंप' होण्याची ही 3 प्रमुख कारणे मानली जात आहेत. 


पहिले कारण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सोमवारी संध्याकाळी अचानक रिजर्व बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. 4 सप्टेंबर 2016 ला त्यांनी आरबीआय चा कार्यभार स्वीकारला होता.


त्यांचा हा राजीनामा कोणत्या झटक्यापेक्षा कमी नसल्याचे जाणकारांचे मत आहे.


गेल्या काही महिन्यांपासून सरकार आणि रिझर्व बॅंक दरम्यानचा कथित तणाव समोर आला होता.


हा तणाव मिटवण्याचा प्रयत्नही झाला, अनेक बैठकाही झाल्या. वादग्रस्त मुद्द्यांवर दोन्ही बाजुने एकमत होत नव्हते. अखेर सोमवारी उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 


दुसरे कारण 



 राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीससगढ, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांतील विधानसभा मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे.


पण याआधीच अनेक एक्झिट पोल समोर आले असून त्यामध्ये भाजपा पिछाडीवर दिसत आहे. याता परिणाम शेअर बाजारावर होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.


जसजसे निकाल समोर येतील तसे शेअर बाजारावरील परिणामही दिसतील. 'एक्झिट पोल'चं शेअर बाजार सहन करु शकला नाही आणि सोमवारी बाजार बंद होतात होता सेंसेक्स 700 अंकानी कोसळल्याची नोंद झाली. 


तिसरे कारण



 सोमवारी दिवसभर शेअर बाजारात दबाव पाहायला मिळाला. दिवसाच्या अखेर पर्यंत सेंसेक्समध्ये 713.53 अंकांच्या घसरणी सोबत 34,959.72 वर निफ्टीत 205.25 अंकाची घसरणी सोबत 10,488.45 अंकावर व्यवहार बंद झाला.


पहिल्या दिवसाच्या बाजारातील घसरणीचा परिणाम आजही पाहायला मिळाला. 


ब्रिटनच्या न्यायालयाने व्यावसायिक विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिल्यानंतर उद्योग जगतात शुभ संकेत मानले जात आहेत.



जर माल्ल्याला भारतात आणलं गेलं तर मोदी सरकारचे हे मोठे यश मानले जाईल यासोबतच बॅंकाही आपलं कर्ज वसूल करु शकतील.