श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ शहरात पोलिसांच्या गस्ती पथकावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात ४ पोलीस शहीद झालेत. अतिरेक्यांनी पोलिसांवर अचानक गोळीबार केला. यात तीन पोलीस जागीच ठार झाले तर एका गंभीर जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीये. पोलिसांनी या परिसरात नाकेबंदी केली असून हल्लेखोर अतिरेक्यांचा शोध घेण्यात येतोय. गस्तीसाठी निघालेल्या पोलिसांची गाडी खराब झाली होती. रस्त्याच्या कडेला गाडी दुरूस्त करत पोलिस थांबले होते. बेसावध असलेल्या पोलिसांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात चार पोलिस शहीद झाले आहेत. तर एक जण जखमी झाला आहे.


इशफाक अहमद मीर,  जावेद अहमद भट्ट,  मोहम्मद इकबाल आणि आदिल मंजूर भट्ट अशी शहीद झालेल्या पोलिसांची नावे आहेत. पोलिसांनी या गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.



दरम्यान, अनंतगनमध्ये भारतीय लष्काराने दोन दहशतवाद्यांना ठार केले. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या दहशतवाद्यांकडून मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.