Atiq Ahmed ची हत्या करणाऱ्या लवलेश तिवारीची शेवटची Reel Viral
Viral Video : उमेश पाल हत्याकांड (Umesh Pal Murder Case) प्रकरणातील आरोपी माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या (Atiq Ahmed Murder) झाडून हत्या करण्यात आली. पत्रकाराच्या वेशात आलेल्या तीनही मारेकऱ्यांना पोलिसांनी पडकलं आहे. त्यातील एका आरोपी लवलेश तिवारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Lovelesh Tiwari Viral Video : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश उमेश पाल हत्याकांडमुळे गाजत आहे. उमेश पाल खून (Umesh Pal Murder) प्रकरणातील आरोपी गँगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) यांना मेडिकलसाठी घेऊन जाताना त्यांचावर गोळीबार (Atiq Ahmed Shot Dead) करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यापूर्वी अतिक अहमद याचा मुलगा असद अहमद (Asad Ahmed Encounter) हा पोलीस चकमकीत मारला गेला. अतिक अहमदवर गोळी झाडणारे मारेकरी पोलिसांच्या ताब्यात आहे.
अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या हत्ये प्रकरणात 3 आरोपी गजाआड आहेत तर दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस राज्यातील कानाकोपऱ्यात जाऊन कसून तपास करण्यात येत आहे. या तीन आरोपी लवलेश तिवारी (Lovelesh Tiwari), सनी सिंह (Sunny Singh) आणि अरुण मौर्य (Arun Maurya) यांच्या गावात जाऊन खोलवर तपास केला जात आहे.
दरम्यान यातील आरोपी लवलेश तिवारीचा (Shooter Lovelesh Tiwari) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्या करण्यापूर्वीचा लवलेशचा हा शेवटचा रील आहे. जो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. या व्हिडीओमध्ये तो एका मित्रासोबत दिसत आहे. ही रील लवलेशने (lovelesh tiwari reels) फेसबुक प्रोफाइलवर शेअर केला आहे. या रीलला वापऱ्यात आलेलं गाण अनेकांचं लक्ष वेधून घेतं आहे. रीलांमध्ये आपल्याला 'जंगलात सिंह, बागेत मोर' ऐकू येतं आहे.