विशाखापट्ट्णम : वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगन रेड्डी यांच्यावर आज विशाखापट्ट्णम विमानतळावर चाकू हल्ला झाला आहे. जगन रेड्डीं सुरक्षित असल्याची माहिती आहे. य़ा हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रेड्डींच्या शर्टावर रक्ताचे डाग दिसून येत आहेत. हल्लेखोर सेल्फी काढण्यासाठी आला आणि त्याने थेट चाकूने जगन रेड्डी यांच्यावर हल्ला केला.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. वडील वाईएस राजेशर रेड्डी यांच्या निधनानंतर जगनमोहन यांनी त्यांची जागा घेतली. 


वायएसआरच्या नेत्यांचा आरोप आहे की, सुरक्षा अधिकाऱ्यांनी निट चौकशी न करता त्याला जाण्याची परवानगी दिली. पक्षाचे आमदार रोजा सेल्वामणी यांनी म्हटलं की, जर या ठिकाणी नेलकटर ही नेण्याची परवानगी नसते तर हा माणूस धारदार हत्यार घेऊन कसा आत आला. त्यांनी टीडीपीवर हल्याचा आरोप केला आहे. 


रेड्डी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची निंदा करत एआयएमआयएमने ट्विटरवर म्हटलं की, 'मी जगन मोहन यांच्यावर झालेल्या हल्ल्याची निंदा करतो. ही सुरक्षेत झालेली मोठी चूक आहे. याची चौकशी झाली पाहिजे. सुरेश प्रभु कोणताही व्यक्ती कसा या ठिकाणी चाकू घेऊन येऊ शकतो. सेल्फीच्या वाढत्या क्रेझमुळे राजकीय नेत्यांच्या जीवाला धोका वाढला आहे.'