औरंगाबादमध्ये पोलिसांनी शिवसेनेचा मोर्चा अडवला
औरंगाबादमध्ये शिवसेनेचा मोर्चा पोलिसांनी अडवला आहे.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये शिवसेनेचा मोर्चा पोलिसांनी अडवला आहे. अवघ्या शंभर मीटरआधीच शिवसेनेचा हा मोर्चा पोलिसांनी अडवला. मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांना एका ग्राउंडवर एकत्र आणण्यात आलं. शिवसेनेच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. दंगलीच्या गुन्ह्यात पोलीस फक्त शिवसैनिकांना टार्गेट करत असल्याचा आरोप शिवसेनेचा आहे, फक्त शिवसैनिकांना अटक केल्या जातेय, तर दंगल करणाऱ्यांना हाथ सुद्धा लावत नसल्याचा आरोपही शिवसेनेनं केला. त्यामुळे हिंदूंची शक्ती दाखवायला या हिंदू शक्ती मोर्चाचे शिवसेनेनं आयोजन केलं होतं. तर या मोर्चाला पोलिसानी परवानगी नाकारली होती.