The Kashmir Files : विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या सिनेमावरुन देशातलं राजकारणही तापलं आहे. काहीजणांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. तर काही जणांनी हा प्रत्येकाने पाहावा असं आवाहन केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोप-प्रत्यारोपांच्या या राजकारणात सध्या एका रिक्षावाल्याची मात्र चांगलीच चर्चा सुरु आहे. द कश्मिर फाईल्स सिनेमा पाहण्यासाठी जाणाऱ्या लोकांना हा रिक्षावाला सिनेमागृहापर्यंत चक्क मोफत नेतो. इंटरनेटवर या रिक्षाचालकाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 


व्हिडिओमध्ये नेमकं काय?
द कश्मिर फाईल्स बघण्यासाठी काही महिला रिक्षाने सिनेमागृहापर्यंत आल्या. यावेळी त्या महिलांनी रिक्षावाल्याला प्रवासाचे पैसे देऊ केले, पण है पैसे घेण्यास रिक्षा चालकाने नकार दिला. जो कोणी हा सिनेमा बघायला येईल, त्या कोणाकडूनही पैसे घेणार नाही, प्रत्येक हिंदूने हा सिनेमा पाहावा असं हा रिक्षा चालक म्हणताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.


महिला प्रवाशी ड्रायव्हरकडे पैसे घेण्याचा आग्रह धरते, तुम्ही मेहनत केली आहे, पैसे घ्या, असं ही महिला म्हणते.  यावर प्रत्येकाने हा सिनेमा पाहिला हवा असं उत्तर रिक्षा चालक देतो. 



हा व्हिडिओ भाजप नेते विष्णू वर्धन रेड्डी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी राजस्थान सरकारलाही टोला लगावला. त्यांनी  आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे 'हा रिक्षाचालक त्याच्या रिक्षात #TheKasmirFiles पाहण्यासाठी येणाऱ्या कोणाकडूनही पैसे घेत नाही. दुसरीकडे राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आहे ज्याने जनतेला सत्य दिसू नये म्हणून कर्फ्यू लावला आहे'