TATA चा हा शेअर म्हणजे पैशांचा पाऊस; 5000 टक्क्यांहून अधिक परतावा देतोय स्टॉक; ही कंपनी करते तरी काय?
TATA Share Price : टाटा समुहाअंतर्गत येणाऱ्या आणखी एका कंपनीनं शेअर बाजारातील परताव्यासंदर्भात नवा विक्रम रचला आहे. मागील चार वर्षांमध्ये या शेअरनं 5000 टक्के रिटर्न दिले आहेत.
TATA Share Price : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, दिवसागणिक या क्षेत्रामध्ये सक्रियरित्या गुंतवणूक करणाऱ्यांचा हा आकडा वाढतानाच दिसत आहे. त्यातही अनेक गुंतवणूकदार काही ठराविक कंपन्यांना, शेअर्सना प्राधान्य देताना दिसतात. कारण असतं ते म्हणजे विश्वासार्हता.
जेव्हाजेव्हा विश्वासार्हतेचा मुद्दा येतो तेव्हातेव्हा या शर्यतीत टाटा उद्योग समूह कायमच अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं. एखादं नवं उत्पादन असो किंवा मग गुंतवणुकीसाठीची आखणी. टाटा समुहाप्रती गुंतवणुकदार कायमच झुकतं मान देताना दिसतात. याच टाटा समुहाच्या एका शेअरनं सध्या शेअर बाजारात धडाकेबाज कामगिरी केली आहे. कारण, मागील चार वर्षांमध्ये टाटा समुहाच्या एका शेअरनं चक्क 5000 टक्क्यांहून अधिकचा परतावा गुंतवणुकदारांना देऊ केल असून, सध्या या शेअरची किंमत 18 रुपयावरून थेट 950 रुपयांवर पोहोचली आहे.
शेअर बाजारावर दबदबा असणाऱ्या या शेअरच्या कंपनीचं नाव आहे, Automotive Stampings & Assemblies Ltd. टाटा समुहाच्या अख्तयारित येणाऱ्या ऑटोमोटीव्ह स्टॅम्पिग्स पॅसेंजर व्हीकल नावाची ही कंपनी पॅसेंजर, कमर्शिअल वेहिकल आणि ट्रॅक्टरनिर्मितीसाठी शीट मेटल कंपनोनंट तयार करते. नुकत्याच पार पडलेल्या व्यावसायिक सदरामध्ये या कंपनीचा शेअर 970.65 रुपयांवर बंद झाला होता.
उपलब्ध माहितीनुसार या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1094 रुपये असून, निच्चांकी आकडा 372 रुपये इतका असून, कंपनीचं मार्केट कॅप 1539 हजार कोटी रुपये इतरं आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये ज्यांनी चार वर्षांपूर्वी लाखाभराची रक्कम गुंतवली त्यांना आता 50 लाखांहून अधिकचा फायदा मिळाला आहे.
हेसुद्धा वाचा : TATA देणार रिलायन्सला दणका; देशाच्या विकासासाठी सरकारसोबत मोठा प्लॅन
शेअरचा प्रवास भारावणारा...
ASAL चा हा शेअर चार वर्षांपूर्वी 18.75 रुपयांवर होता. आता मात्र तोच शेअर थेट 970.65 रुपयांवर बंद झाला आहे. ऑटोमोटीव्ह स्टॅम्पिंग्सच्या शेअरमध्ये दरम्यानच्या काळात 5075 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली आहे. परिणामी या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्यांसाठी हा भरभराटीचा काळ आहे असेच संकेत मिशळत आहे. मागील 6 महिन्यांमध्ये या शेअरनं गुंतवणूकदारांना 100 टक्के नफा दिला असून, यादरम्यान शेअरनं गुंतवणूकदारांचा दीर्घकालीन विश्वासही जिंकला आहे.
(शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची असून, तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच यासंबंधीचा निर्णय घ्या.)