TATA देणार रिलायन्सला दणका; देशाच्या विकासासाठी सरकारसोबत मोठा प्लॅन

Business News : इथं मुकेश अंबानी आणि संपूर्ण अंबानी कुटुंब अनंत अंबानी- राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्यामध्ये व्यग्र असतानाच तिथं एक मोठी बातमी समोर आली आहे.   

सायली पाटील | Updated: Jul 17, 2024, 12:21 PM IST
TATA देणार रिलायन्सला दणका; देशाच्या विकासासाठी सरकारसोबत मोठा प्लॅन  title=
Ratan Tata vs Mukesh Ambani tcs along with bsnl to provide fast and cheap 4g internet latest news

Business News : आशिया खंडातील सर्वात धनाढ्य कुटुंबापैकी एक असणाऱ्या अंबानी कुटुंबात नुकताच शाही विवाहसोहळा पार पडला. हा विवाहसोहळा होता मुकेश अंबानी यांच्या धाकट्या चिरंजीवाचा अर्थात अनंत अंबानीचा. अनंतनं राधिका मर्चंटशी विवाहबंधनात अडकत नव्या जीवनाची सुरुवात केलेली असतानाच आता लग्नाच्या या धामधुमीतून वेळ काढत अंबानी कुटुंब पुन्हा एकदा व्यवसायाकडे लक्ष वेधताना दिसत आहे. पण, तत्पूर्वी या कुटुंबाला एका बातमीनं दणका बसू शकतो. कारण, TATA समुहाकडून तशीच काहीशी तयारी करण्यात आली आहे. (Mukesh Ambani)

गेल्या काही काळामध्ये एअरटेल आणि रिलायन्ससारख्या टेलिकॉम कंपन्यांकडून रिचार्ज दरांमध्ये सातत्यानं वाढ करण्यात आली. ज्यामुळं ही सेवा वापरणाऱ्यांनी हे वाढते दर पाहता आपला मोर्चा BSNL च्या दिशेनं वळवण्यास सुरूवात केली, थोडक्यात इथं रिचार्जचे दर तुलनेनं कमी असल्यामुळं अनेकांनीच आपले मोबईल क्रमांक बीएसएनएलमध्ये पोर्ट करण्यास सुरुवात केली.  

टाटा टाकणार पुढचं पाऊल... 

रिचार्जची दरवाढ आणि त्यामुळं सामान्यांना सोसावी लागणारी आर्थिक झळ पाहता आता टाटा समुहानं एक पाऊल पुढे टाकत एक नवा निर्णय घेतला आहे. जिथं TATA Group मधील टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस आणि बीएसएनएल या सरकारी टेलीकॉम कंपनीमध्ये 15000 कोटी रुपयांचा एक नवा करार झाला आहे. या कराराअंतर्गत या दोन्ही कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील जवळपास 1000 गावांमध्ये 4G इंटरनेट सेवा पुरवण्याचा मानस केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. 

हेसुद्धा वाचा : हेच तर हवं होतं... Royal Enfield Guerrilla 450 लाँच होताच बाईकप्रेमी आनंदाच्या भरात असं काय म्हणतायत? 

सध्याच्या घडीला 4जीच्या दुनियेत जिओ आणि एअरटेल अग्रस्थानी असून, आता त्यांचा दबदबा बीएसएनएलच्या येण्यानं कमी होतो का, हे पाहणं महत्त्लाचं ठरणार आहे. सध्याच्या घडीला टाटा समुहाकडून देशातील चार विविध भागांमध्ये डाटा सेंटर तयार करण्यात येत असून, 4G साठीच्या वातावरणाचा पाया आणखी भक्कम होणार आहे.