बेंगळुरू : मुंबई आणि बेंगळुरू हे ट्रॅफिक जामसाठी खूपच प्रसिद्ध आहे. येथे वाहनांची अशी काही गर्दी असते की, कामाच्या वेळेला ट्राफीक जाम झालंच म्हणून समजा. आपल्याला कुठेही लवकर पोहोचायचे असेल, तर आपण टॅक्सी किंवा रिक्षाने प्रवास करतो. ते आपल्याला वेळेत पोहोचवण्यासाठी मदत करतात. परंतु ट्राफीक जामची समस्या ते देखील सोडवू शकत नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसं पाहाता या टॅक्सी किंवा रिक्षा चालकाला शहर कसे कार्य करते हे समजते. परंतु आपल्या सारख्या प्रवाशांना याची माहिती नसते किंवा आपण याकडे फारसं लक्ष देत नाही.


पण एका रिक्षा चालकाच्या उत्तराने तुम्हाला हे नक्की कळेल की, त्यांना तुमच्या वेळेची माहिती असते आणि काळजी देखील.


प्रवासी आणि ऑटोरिक्षा चालक यांच्यातील एक संभाषण सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. ही घटना 8 जून रोजी @kulbworks खात्याने ट्विटरवर पोस्ट केली होती.


एका व्यक्तीने ऑफिसला जाण्यासाठी ऑटो बुक केली होती. ऑटोरिक्षा चालकाने प्रवाशाला वाटेत सीएनजी रिफिल घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रवाशाने त्याला होकार दिला, मात्र ट्रॅफिकमध्ये अडकल्याने प्रवाशाने त्या चालकाला गाडी थेट ऑफिसकडे घेऊन जाण्यास सांगितले.



त्यावर ऑटोरिक्षा चालकाने जी प्रतिक्रिया दिली, त्याने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे खेचले. हा रिक्षा चालक त्या प्रवाशाला म्हणाला की, "तुझा लॉगईन टाईम कधीचा आहे?"  हे ऐकून ती व्यक्ती थोडा वेळ विचारात पडली.


त्यानंतर या व्यक्तीने स्वत: ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली, जी ट्रेंड होऊ लागली.


ज्यावर युजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ट्विटरवर त्यांचे अनुभवही शेअर केले. एका यूजरने सांगितले की, 'ऑटोवाल्याने नेमका शब्द विचारला, 'लॉगिन'.