New Corona Norms On Airport: दिल्ली उच्च न्यायालयाच्या (Delhi High Court) आदेशानंतर भारतीय विमान वाहतूक नियामक (DGCA) ने विमानतळ (Airport) आणि विमानांसाठी (Airplane) नवीन कोविड नियम (Covid Protocol) जारी केले आहेत. या नवीन नियमानुसार विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह सर्व कर्मचाऱ्यांना मास्क घालणं  (Wear Mask) अनिवार्य करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मास्क काढण्याची (Remove Mask) परवानगी केवळ अपवादात्मक परिस्थितीत दिली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना नियमानुसार शिक्षाही होऊ शकते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उल्लंघन करणाऱ्यांना नो फ्लाय लिस्टमध्ये (No Fly List) टाकलं जाण्याची शक्यता आहे.


दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी विमानतळ आणि विमानांमध्ये मास्क घालणे आणि हात धुणे बंधनकारक केलं होतं, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. कोविड-19  प्रतिबंधित नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याबरोबरच आर्थिक दंडही ठोठावण्यात यावा असं न्यायालयाने म्हटलं आहे. अशा लोकांना 'नो-फ्लाय' यादीत टाकण्यात यावं, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.


नियमांचं पालन होत नाही
प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्या खंडपीठाने सांगितलं की नियमांचे पालन गांभीर्याने होत नसल्याचं अनेकदा निदर्शनास आलं आहे, त्यामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयासह (DGCA) इतर संस्थांनी नियमांचे पालन कठोरपणे करणं आवश्यक आहे. यासाठी डीजीसीएने एअरलाइन्सना स्वतंत्र बंधनकारक निर्देश जारी करावेत, असे खंडपीठाने म्हटलें आहे.