Ayodhya Ram Mandir Pujari Recruitment: अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिर उभारण्यात आले आहे. राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पुजारी निवडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 20 पुजाऱ्यांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. यासाठी देशभरातून अर्ज मागविण्यात आले होते. याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पुजारी पदासाठी 3 हजार लोकांनी अर्ज केले आहेत. यानंतर अयोध्येतील कारसेवकपुरममध्ये मुलाखती घेण्यात आल्या आणि 3 हजारांमधून 200 उमेदवारांची निवड करण्यात आली. यातून 20 जणांची राम मंदिराचे पुजारी म्हणून निवड केली जाणार आहे. त्याआधी या पुजाऱ्यांना 6 महिन्यांचे प्रशिक्षणही दिले जाईल, असे सांगण्यात येत आहे.


कशी होणार निवड?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुजाऱ्यांच्या निवडीसाठी 3 सदस्यांचे मुलाखतीचे पॅनल आहे.  यामध्ये वृंदावनचे जयकांत मिश्रा आणि अयोध्येचे दोन महंत, मिथिलेश नंदिनी शरण आणि सत्यनारायण दास यांचा समावेश आहे.  ज्यांची निवड करण्यात आली आहे आणि ज्यांची निवड होऊ शकली नाही, अशा सर्वांना प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. भविष्यात त्यांना पुजारी म्हणून नियुक्त केले जाऊ शकते, असे राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांनी सांगितले.


कसे प्रशिक्षण दिले जाणार?


मुलाखतीदरम्यान, उमेदवारांना पूजा प्रक्रियेशी संबंधित अनेक कठीण प्रश्न विचारण्यात आले. संध्या वंदन, त्याची प्रक्रिया आणि मंत्र यावर अधिक लक्ष जास्त प्रश्न विचारण्यात आले. निवडलेल्या उमेदवारांना कारसेवकपुरममध्येच 6 महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांच्या शिक्षणासाठी धार्मिक अभ्यासक्रमही तयार केला जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना मोफत जेवण दिले जाणार आहे. याशिवाय प्रत्येक महिन्याला 2000 रुपये स्टायपेंड देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


सिंहासन बनवण्याची तयारी जोरात


अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या रामललाच्या भव्य मंदिराचे सिंहासन बनवण्याचे कामही वेगाने सुरू आहे. गर्भगृहाच्या आत 3 फूट उंचीचे सिंहासन तयार केले जात आहे. ज्यावर रामललाला बसवले जाईल. अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात भगवान रामललाची विराजमान होण्याची वेळ जवळ येत आहे. मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे या प्रतीक्षेत भाविक आहेत. मंदिराच्या आत, रामलल्ला सोन्याच्या संगमरवरी जडवलेल्या 3 फूट उंच'सिहांसनावर विराजमान होतील. जे 8 फूट लांब आणि 4 फूट रुंद असेल.