नवी दिल्ली : आयुर्वेदीक डॉक्टरांना अलोपॅथीची प्रॅक्टिस बंदी संदर्भात कायदा केला जात असल्यामुळे देशभरातील हजारो आयुर्वेदीक डॉक्टरांनी  दिल्लीत केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चा काढला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन या संघटनेनं हा मोर्चा काढला. नीती आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार आयुर्वेदिक डाँक्टरांसंदर्भात एक नवा कायदा करण्याच्या विचारात आहे. हा नवा कायदा मंजूर झाला तर आयुर्वेदिक डाँक्टरांना अलोपॅथीची प्रॅक्टिस करता येणार नाही.


आयुर्वेदाला अधिक चालना मिळण्यासाठी आपण हे पाऊल उचलत असल्याचा आयोगाचा दावा आहे. पण आयुर्वेदात अजून पुरेसं संशोधन झालेलं नसताना, देशात संख्येनं सर्वाधिक असलेल्या बीएमएमस, युनानी डाँक्टरांना माँडर्न मेडिसन वापरण्यापासून रोखणं हे चुकीचं असल्याचा डाँक्टरांचा दावा आहे. तसंच ग्राहकांसाठीही आरोग्य सेवा महाग होऊन बसेल असा संघटनेचा दावा आहे. विशेष म्हणजे देशात सर्वाधिक महाराष्ट्रीयन बीएएमएस डाँक्टर या संघटनेचे सदस्य आहेत.