या व्यक्तीशी बोलण्यासाठी तरसतोय राम रहीम, पोलिसांना दिला नंबर
दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणात दोषी गुरमीत राम रहीम २० वर्षाच्या शिक्षेसाठी तुरुंगात आहे. जेलमध्येही तो त्याची दत्तक मुलगी हनीप्रीतला भेटण्याची इच्छा व्यक्त करतोय. राम रहीमने जेल प्रशासनाला १० लोकांची यादी दिली आहे. जे त्याला भेटण्यासाठी येऊ शकतात. या यादीत राम रहीमने हनीप्रीतचं नाव सर्वात आधी लिहिलं आहे. ऐवढच नाही तर तिच्याशी बोलण्यासाठी तिचा मोबाईल नंबर देखील त्याने पोलीस प्रशासनाला दिला आहे. हनीप्रीत सोबतच त्याने त्याच्या दोन्ही मुली आणि जावई, मुलगा, सून आणि डेराच्या काही लोकांची नावे दिली आहेत. मुलीचा नंबर देखील त्याने दिला आहे.
रोहतक : दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणात दोषी गुरमीत राम रहीम २० वर्षाच्या शिक्षेसाठी तुरुंगात आहे. जेलमध्येही तो त्याची दत्तक मुलगी हनीप्रीतला भेटण्याची इच्छा व्यक्त करतोय. राम रहीमने जेल प्रशासनाला १० लोकांची यादी दिली आहे. जे त्याला भेटण्यासाठी येऊ शकतात. या यादीत राम रहीमने हनीप्रीतचं नाव सर्वात आधी लिहिलं आहे. ऐवढच नाही तर तिच्याशी बोलण्यासाठी तिचा मोबाईल नंबर देखील त्याने पोलीस प्रशासनाला दिला आहे. हनीप्रीत सोबतच त्याने त्याच्या दोन्ही मुली आणि जावई, मुलगा, सून आणि डेराच्या काही लोकांची नावे दिली आहेत. मुलीचा नंबर देखील त्याने दिला आहे.
राम रहीम रोहतकमधील सुनारिया जेलमध्ये बंद आहे. जेल नियमानुसार कैद्याला भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांची लिस्ट आधीच घेतली जाते. यानुसार राम रहीमने पहिली लिस्टमध्ये हनीप्रीतचं नाव दिलं नव्हतं. यामुळे सगळेच हैराण झाले होते पण आता त्याने हनीप्रीतचं नाव दिलं आहे. हनीप्रीत सध्या फरार असल्याचं बोललं जातं आहे.