मुंबई : HDFC बँकेनं गृहकर्ज आणि वाहनकर्जांच्या दरात वाढ केली आहे. बँकेचं कर्ज आणखी 0.35 टक्क्यांनी महागलं आहे. 4 मे रोजी रिझर्व्ह बँकेनं 0.40 टक्क्यांनी व्याजदर वाढवले होते. त्यानंतर सर्वच मोठ्या बँकांनी आपली कर्ज महाग केली. HDFCनं आजपासून नवे व्याजदर लागू केले असून त्यामुळे कर्जदारांचा ईएमआय वाढणार आहे. या दरवाढीमुळे गृहनिर्माण, वाहन, वैयक्तिक या दीर्घकालीन कर्जांसह अन्य कर्ज महागली आहेत. (HDFC bank Increase rate of Interest)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक सुरू आहे. या बैठकीचा निकाल येण्यापूर्वीच खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने कर्जदारांना पुन्हा दणका दिला आहे. बँकेने मंगळवारी कर्जदरात 0.35 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँकेने दोन महिन्यांतील व्याजदरात केलेली ही दुसरी वाढ आहे. HDFC बँकेने दोन वेळा कर्जावरील व्याजदरात 0.60 टक्क्यांनी वाढ केली आहे.


एचडीएफसी बँकेच्या वेबसाईटवर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, 7 जूनपासून बँकेने एमसीएलआरमध्ये 0.35 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँकेचा एक वर्षाचा MCLR 7.50 टक्क्यांवरून 7.85 टक्के झाला आहे. त्याच वेळी, तीन वर्षांचा MCLR 7.70 टक्क्यांवरून 8.05 टक्के करण्यात आला आहे. या वाढीमुळे MCLR वर आधारित नवीन कर्जाचे व्याजदर महाग होणार आहेत. ज्यांच्याकडे आधीच कर्ज आहे त्यांच्या EMI देखील वाढणार आहे.


रिझव्‍‌र्ह बँकेच्या चलनविषयक आढावा बैठकीच्या निकालापूर्वीच एचडीएफसी बँकेने हे पाऊल उचलले आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे कर्ज अधिक महाग होईल.