IndiGo च्या वाईट अनुभवावर Rana Daggubati ची संतप्त प्रतिक्रिया म्हणाला...
Rana Daggubati नं सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही पोस्ट शेअर केली असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.
Rana Daggubati on IndiGo Worst Service : बाहुबली (Bahubali) फेम अभिनेता राणा डग्गुबती (Rana Daggubati) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. राणा हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत राणा चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकतीच राणानं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत इंडिगो (IndiGo) या विमान कंपनीनं प्रवास करताना आलेला सगळ्यात वाईट अनुभव सांगितला आहे.
पाहा काय म्हणाला राणा डग्गुबती
राणानं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत त्याला आलेला हा अनुभव सांगितला आहे. राणा म्हणाला 'भारताचं आतापर्यंतचं सर्वात वाईट एअरलाइन अनुभव इंडिगो 6E. फ्लाइटची वेळ माहित नाही. हरवलेल्या सामानाबाबत काहीही माहिती नाही. कर्मचाऱ्यांनाही माहीत नाही? या पेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते.'
राणानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत इंडिगो फ्लाइटनं आलेला अनुभव सांगताच कंपनीनं त्यावर प्रतिक्रिया देत माफी मागितली आहे. तुम्हाला झालेल्या गैरसोयीसाठी आम्ही माफी मागतो. आमची टीम लवकरात लवकर तुमचा सामान परत मिळवून देण्याच्या कामात आहे. (bahubali fame actor rana daggubati shares worst experience in indigo airline)
हेही वाचा : अपूर्व अग्निहोत्री ते Saif Ali Khan पर्यंत 'हे' सेलिब्रिटी वयाची 50 शी ओलांडल्यानंतर झाले वडील
सध्या सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत इंडिगोचे दोन बॅगेज सांभाळणारे स्टाफ मेंबर्स विमानातून येणारं लगेज एका ट्रकमध्ये अनलोड करत असून ते सगळा सामान कसाही फेकत आहेत. या व्हिडीओवरही इंडिगोनं उत्तर दिले आहे. हा ग्राहकांचा सामान नाही तर बॉक्समध्ये लॉन फ्रेजिल कार्गो आहेत ज्यांना लवकर घेऊन जाण्यासाठी पॅक करण्यात आलं होतं. इंडिगो विमान कंपनीच्या सेवेबाबत यापूर्वीही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. जूनमध्ये अभिनेत्री पूजा हेगडेनेही इंडिगो कर्मचाऱ्यांच्या असभ्य वागणूकी विषयी सांगितले होते.