मुंबई : फेस्टिव्ह सीझनमध्ये चार चाकी गाड्यांच्या विक्रीत वाढ झालीच पण सोबतच टू-व्हीलर गाड्यांच्या विक्रीचाही उच्चांक गाठला गेलाय. परंतु, यामध्ये अशाही काही कंपन्या आहेत ज्यांना नुकसानही सोसावं लागलंय. बजाज ऑटोची नोव्हेंबर महिन्यातील विक्री गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील तुलनेत २५ टक्क्यांनी वाढलीय. यंदा या कंपनीच्या ४,०६,९३० गाड्यांची विक्री नोंदविण्यात आली. एका वर्षापूर्वी याच काळातील कंपनीची विक्री ३,२६,८१८ युनिट नोंदविण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोव्हेंबर महिन्यात बजाज मोटारसायकलची विक्री ३१ टक्क्यांनी वाढून ३,४६,५४४ युनिटवर पोहचली... गेल्या वर्षी याच महिन्यात ही विक्री २,६३,९७० युनिट होती. कंपनीचा एक्सपोर्ट दर १७ टक्क्यांनी वाढून १,७२,११२ युनिटवर पोहचलेला पाहायला मिळाला. एका वर्षापूर्वी हा दर होता १,४६,६२३ युनिट...


रॉयल एनफील्डला नुकसान


दुसरीकडे, दमदार बुलेटसाठी ओळखल्या जाणाऱ्या रॉयल एनफील्डची नोव्हेंबरची विक्री ६ टक्क्यांनी घसरली. यंदा या महिन्यात केवळ ६५,७४४ बाईक विकल्या गेल्या. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा आकडा ७०,१२६ मोटारसायकलवर होता. 


आयशर मोटर्सच्या टू-व्हीलर कंपनी रॉयल एनफील्डनं दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या गाड्यांची घरगुती बाजारातील विक्री ६५,०२६ युनिट राहिली. तर नोव्हेंबर २०१७ मध्ये हा आकडा ६७,७७६ युनिटसवर होता. तर या दरम्यान कंपनीचा निर्यात दर ६९ टक्क्यांनी घसरून ७१८ युनिटसवर राहिला. गेल्या वर्षी कंपनीनं या महिन्यात २,३५० वाहनांची विक्री केली होती.