गॅसच्या फुग्यांमुळे उडाला यज्ञातील अग्नीचा भडका; तीन जण जखमी
मैसुरमधील सूत्र मठात पुजा सुरु असताना हा प्रकार घडला.
कर्नाटक : मैसुर येथे मंगळवारी (५ फेब्रुवारी) यज्ञ सुरु असताना फुग्यांना आग लागल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पण यात तीन जण जखमी झाले आहेत.
मैसुरमधील सूत्र मठात पुजा सुरु असताना हा प्रकार घडला. यज्ञाचे विधी सुरु असताना काहीजण हे गॅसचे फुगे घेऊन उभे होते. हे फुगे यज्ञ समाप्त झाल्यानंतर उडवण्यात येणार होते. पण अचानक या फुग्यातून गॅस बाहेर पडायला सुरुवात झाली. यामुळे यज्ञातील अग्नीचा जोरदार भडका उडाला.
गॅसच्या फुग्यात नायट्रोजन गॅस भरलेलं असते. त्यामुळे आगीने लवकर पेट घेतला. यात तिघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. आग लागताच तेथील उपस्थितांनी एकच धूम ठोकली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यापूर्वी हावडातील बागनान ठाणे परिसरातील एका मैदानात फुग्यात गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट झाला होता. यात फुगे विक्रेत्यासोबतच दोघांना जीव गमवाला लागला होता.