बंगळुरु : कर्नाटकातील श्रीरंगपटना येथील लोकांना लाल रंगाची बीएमडब्ल्यू कार (Red BMW Car) नदीत वाहून जाताना पाहून धक्काच बसला. गाडी नदीत वाहत असल्याचे पाहून प्रथम लोकांना हा अपघात असल्याचं वाटलं. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. काही लोकांनी नदीत उडी घेतल्यानंतर त्यात कोणी अडकलं तर नाही ना याची देखील पृष्टी केली. पण कारमध्ये कोणीच नव्हतं. यानंतर लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (Depressed man drives car into River)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी पाण्यात बुडालेली कार बाहेर काढली. ही कार BMW ची X6 सीरीजची कार होती. भारतीय बाजारपेठेत ज्यांची किंमत सुमारे 1.3 कोटी रुपये आहे. पण ही कार नदीत कशी पडली. याबाबत लोकांना आधी काहीच माहिती नव्हती. पण जेव्हा माहिती मिळाली तेव्हा अनेकांना धक्का बसला.


पोलिसांनी कार बाहेर काढल्यानंतर गाडीचा तपास सुरु केला. वाहतूक विभागाकडून अशी माहिती मिळाली की, ही गाडी बंगळुरूच्या महालक्ष्मी लेआउटमध्ये राहणाऱ्या व्यक्तीची आहे. या व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं. पण अधिकाऱ्यांना योग्य उत्तर मिळालं नाही. पण त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्याच्या आईच्या निधनानंतर तो डिप्रेशनमध्ये होता, त्यामुळे त्याने त्याची बीएमडब्ल्यू एसयूव्ही पाण्यात टाकून दिली.


महागडी कारपैकी एक


पोलिसांनी त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवून त्या व्यक्तीला सोडून दिले आणि कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नाही. पाण्यातून बाहेर काढलेली BMW X6 SUV व्यक्तीच्या कुटुंबीयांना परत केली. BMW ची X6 SUV ही भारतातील जर्मन लक्झरी कार ब्रँडची सर्वात महागडी कार आहे. या मॉडेलच्या किमती ₹1.05 Cr (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.