OLA वर बूक केली बंगळूरू ते नॉर्थ कोरिया राईड, बिल झाले ....
रोड ट्रीप करण्याची मज्जा काही औरच असते.
बॅंगलोर : रोड ट्रीप करण्याची मज्जा काही औरच असते. भारतामध्ये अशी अनेक डेस्टिनेशन्स आहेत. परंतू बंगळूरूच्या एका मुलाने चक्क बंगळूरूहून नॉर्थ कोरिया या रोड ट्रीपसाठी ओला बुक केलेली आहे.
ट्विटरकर दिली माहिती
नॉर्थ कोरियाला जाण्यासाठी ओला अॅपवर रोहितने चक्क एक मिनी गाडी बुक केली आहे. त्यावर ओलानेही एस्टिमेटेड प्राईज दाखवली होती. ओला मिनीने दाखवलेले बिल हे सुमारे दीड लाखाचे आहे.
कसं शक्य ?
मुंबईत ओला - उबरने सद्ध्या बंद पुकारला आहे. मात्र दक्षिण कोरियासाठी ओला कशी बुक होऊ शकते ? हा प्रश्न तुमच्याही मनात डोकावला असेल ना ? मग यावर ओलाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्याचं कारण स्पष्ट करण्यात आलं आहे.
काय आहे ओलाचं म्हणणं ?
ओलाने दिलेल्या माहितीनुसार हा एक टेक्निकल इश्यू आहे. काही तांत्रिक कारणामुळे ही बुकिंग झाली आहे. ओलावर परदेशात राईड बुक करण्याची कोणतीही सोय नाही. तांत्रिक चूकीमुळे बूक झालेल्या या राईडचा स्क्रीनशॉट मात्र सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.