मुंबई : ऑक्टोबर महिना संपण्यासाठी 14 दिवस बाकी असले तरी देखील देशातील वेगवेगळ्या भागातील बँका या 14 दिवसांमध्ये 6 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे वेळेच्या आधी बँकांची कामे करुन घ्या. 31 ऑक्टोबरच्या आधी देशातील अनेक बँका वेगवेगळ्या कारणांमुळे बंद राहणार आहेत. पीटीआयच्या माहितीनुसार 10 बँकांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात 22 ऑक्टोबरला बँक युनियनने संपावर जाण्याची घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखिल भारतीय बँक कर्मचारी संघ आणि भारतीय बँक कर्मचारी संघ यांनी संपाची हाक दिल्यामुळे या संपात भारतीय ट्रेड यूनियन काँग्रेस देखील सहभागी होणार आहे. जर हा संप झाला तर 22 ऑक्टोबरपर्यंत बँका बंद राहणार आहेत.


सरकारने 10 बँकांचा विलिनीकरण करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या विलिनीकरणानंतर 4 नव्या बँका अस्तित्वात येणार आहे. तर आंध्रा बँक, इलाहाबाद बँक, सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचं अस्तित्व संपणार आहे.


22 ऑक्टोबरच्या आधी 20 ऑक्टोबरला रविवार असल्याने बँकांना सुट्टी असणार आहे. 26 ऑक्‍टोबरला चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. दिवाळीच्या दरम्यान 3 दिवस बँका बंद राहणार आहेत. 28 ऑक्‍टोबरला दिवाळी  आणि 27 ऑक्टोबरला रविवार असल्यानेबँकांना सुट्टी असणार आहे.


दिवाळीनंतर 28 ऑक्टोबरला गोवर्धन पूजा असल्याने देशातील काही भागांमध्ये या दिवशी देखील बँका बंद राहणार आहेत. 29 ऑक्टोबरला भाऊबीज असल्याने देखील काही भागांमध्ये बँका बंद असणार आहेत.