ATM Card Online Apply :  तुम्हीही एटीएम कार्ड (ATM Card) वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एटीएम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना 5 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे बँकेने सांगितले आहे. होय, बँकेच्या या सुविधेबद्दल अनेकांना माहिती नाही. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही 5 लाखांचा फायदा कसा घेऊ शकता. (bank give 1 to 5 lakh ruppes accidental insurance for atm card holder know details)


बँक सुविधा काय आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या देशातील बहुतांश बँक खातेधारक हे एटीएम कार्ड वापरतात. तर अशा परिस्थितीत 5 लाखांचा फायदा कसा घ्यायचा?  बँकेच्या वतीने एटीएम वापरकर्त्यांना विम्याची सुविधा दिली जाते. 


अपघाती विमा


एटीएम कार्डद्वारे ग्राहकांना अनेक प्रकारच्या मोफत सेवा दिल्या जातात. विमा (Insurance)  हा देखील यापैकी एक आहे. बँकेने ग्राहकाला एटीएम कार्ड देताच, ग्राहकाला अपघाती विम्याची (Accidental Insurance) सुविधा मिळते. जरी अनेकांना या विम्याबद्दल माहिती नाही. 


श्रेणीनुसार विमा


बँक कार्डधारकांना वेगवेगळ्या श्रेणीनुसार विमा देते.  क्लासिक, प्लॅटिनम आणि सामान्य अशा 3 कॅटेगरी आहेत. सामान्य मास्टरकार्डवर 50,000 रुपये, क्लासिक एटीएम कार्डवर 1 लाख रुपये, व्हिसा कार्डवर 1.5 ते 2 लाख रुपये आणि प्लॅटिनम कार्डवर 5 लाख रुपयांचा अपघाती विमा असतो.


मृत्यू झाल्यास विम रक्कम


एटीएम कार्ड वापरणाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत विमा उपलब्ध आहे. दुसरीकडे जर एका हाताला किंवा एका पायाला इजा झाली असेल, तर त्या प्रकरणात 50 हजार रुपयांपर्यंतची विम्याची रक्कम उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला बँकेकडे अर्ज करावा लागेल. कार्डधारकाच्या नॉमिनीला अर्ज बँकेत जमा करावा लागतो.