मुंबई : बॅंक खातेधारकांसाठी सर्वांत मोठी बातमी समोर येत आहे. तुमची जर बॅंकेची काही कामे पेंडीग असतील तर आताचं पुर्ण करून घ्या. कारण ऑगस्ट महिन्यात 18 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुमची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ऑगस्टमध्ये आपल्या यादीत अनेक दिवस बँक बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. ऑगस्टमध्ये मोहरम, रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी असे अनेक सण आहेत. त्यामुळे या दिवशी बँका बंद राहणार आहेत. 


जुलै महिना आता संपत आला आहे. तर आठवड्याभरातच ऑगस्ट महिना लागणार आहे. त्यात ऑगस्ट महिन्यात 18 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात बॅंकाच्या कामांसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला जर बॅकांची कामे करायची असल्यास याच महिन्यात उरकून घ्या. अन्यथा तुमची कामे रखडण्याची शक्यता आहे.   


ऑगस्टमध्ये सणांमुळे बँका 13 दिवस बंद राहतील. या साप्ताहिक सुट्या एकत्र केल्यास, ऑगस्टमध्ये संपूर्ण 18 दिवसांची बँक सुट्टी असेल.


'या' तारखांना बँका बंद 
1 ऑगस्ट : द्रुपका शे-जी (सिक्कीममध्ये बँका बंद)
7 ऑगस्ट: पहिला रविवार (साप्ताहिक सुट्टी)
8 ऑगस्ट: मोहरम (J&K मध्ये बँका बंद)
9 ऑगस्ट: मोहरम (अगरतळा, अहमदाबाद, ऐझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा, रायपूर आणि रांची येथे बँका बंद)
11 ऑगस्ट: रक्षा बंधन (सर्वत्र सुट्टी)
12 ऑगस्ट: रक्षा बंधन (कानपूर-लखनौ बँक बंद)
13 ऑगस्ट: दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
14 ऑगस्ट: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन
16 ऑगस्ट: पारशी नववर्ष (मुंबई-नागपूरमध्ये बँका बंद)
18 ऑगस्ट: जन्माष्टमी (सर्वत्र सुट्टी)
ऑगस्ट १९: जन्माष्टमी श्रावण वद-८/कृष्ण जयंती (अहमदाबाद, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, गंगटोक, जयपूर, जम्मू, गतना, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर येथे बँका बंद)
20 ऑगस्ट: कृष्णा अष्टमी (हैदराबाद)
21 ऑगस्ट: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
27 ऑगस्ट: चौथा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
28 ऑगस्ट: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
29 ऑगस्ट : श्रीमंत शंकरदेव तारीख (गुवाहाटी)
31 ऑगस्ट: गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँका बंद)