नवी दिल्ली :  जर बॅंकेसंबंधी तुमचे काही काम अडले असेल तर आजच पूर्ण करा. कारण पुढचे दोन दिवस बॅंक बंद राहणार आहेत. शनिवार 13 एप्रिलला बॅंकांना राम नवमीची सुट्टी असणार आहे. तर 14 एप्रिलला रविवार असल्यानेही बॅंक बंद असतील. या दोन्ही दिवशी आंबेडकर जयंती आणि बैसाखी देखील येतेय. तसेच शनिवार आणि रविवारी असल्याने बॅंकांची सुट्टी कमी होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


एप्रिल 13 आणि 14 एप्रिलला दुसऱ्या शनिवारी आणि रविवार असल्याने बॅंक बंद राहतील. या दोन्ही दिवशी आंबेडकर जयंती आणि बैसाखी देखील येतेय. या दोन्ही सुट्ट्या शनिवार आणि रविवारी असल्याने बॅंकांची सुट्टी कमी होईल. 




यानंतर 3 दिवसांनीही पुन्हा बॅंक हॉलीडे असणार आहे. 17 एप्रिल (बुधवारी) महावीर जयंती असल्या कारणाने अधिकतर राज्यांमध्ये बॅंकाना सुट्टी राहील. याच्या एक दिवसानंतर 19 एप्रिलला गुड फ्रायडे आहे. यामुळे 19 एप्रिललाही बॅंक बंद राहतील. चौथा शनिवार 27 एप्रिलला येत आहे. म्हणजेच एप्रिलमध्ये 20 एप्रिलला शनिवारी बॅंका खुल्ल्या राहतील.