Bank Holiday June 2024: देशातील सर्व आर्थिक संस्था आणि बँकांच्या प्रत्येक व्यवहारावर करडी नजर ठेवून असणाऱ्या सर्वोच्च संस्थेनं अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) नुकतीच एक महतत्वाची यादी जाहीर केली आहे. जून महिन्यात देशातील कोणकोणत्या बँकांना सुट्टी असेल यासंदर्भातील ही यादी असून, आठवडी सुट्ट्या वगळता इतरही अनेक कारणांनी देशातील विविध राज्यांमधील बँका बंद राहणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थोडक्यात जून महिन्यात प्रत्यक्ष बँकेच जाऊन एखादं काम मार्गी लावण्याचा तुमचाही बेत असेल तर, आधी सुट्ट्यांची यादी पाहून घ्या.  (June 2024 Bank Holiday List) प्राथमिक माहितीनुसार जून महिन्यात बँकांना 12 दिवस सुट्टी असेल. पण देशातील सर्वच बँका 12 दिवस सरसकट बंद राहणार नसून, प्रत्येत राज्यानुसार या सुट्ट्या विभागून देण्यात आल्या आहेत. यामध्ये बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसह प्रत्येक रविवारी असणाऱ्या आठवडी सुट्ट्यांचाही समावेश आहे. 


जून महिन्यात कोणकोणत्या दिवशी बँका बंद? 


1 जून 2024- ज्या भागांमध्ये निवडणुकीच्या धर्तीवर मतदान आहे तेथील बँका बंद. 
2 जून 2024- रविवार असल्यामुळं ही बँकांची आठवडी सुट्टी असेल. 
8 जून 2024- महिन्यातील दुसरा शनिवार असल्यामुळं संपूर्ण देशातील बँका बंद. 
9 जून 2024- रविवार, बँकांची आठवडी सुट्टी. 
16 जून 2024- रविवार असल्या कारणानं आठवडी सुट्टीमुळं बँका बंद. 
22 जून 2024- महिन्यातील चौथा शनिवार, देशभरातील बँकांना सुट्टी. 
23 जून 2024- रविवार, देशातील बँकांची आठवडी सुट्टी. 
30 जून 2024- महिन्याचा शेवटचा रविवार, आठवडी सुट्टीमुळं बँका बंद. 


जून महिन्यातील कोणत्या महत्त्वाच्या दिवशी बँकाना रजा? 


10 जून सोमवार- श्री गुरू अर्जुन देव शहीदी दिनानिमित्त पंजाबमधील बँका बंद. 
14 जून शुक्रवार- पाहिली राजानिमित्त ओडिशातील बँका बंद. 
15 जून शनिवार- मिझोरममध्ये YMA दिनानिमित्त आणि 
ओडिशामध्ये राजा संक्रांतीनिमित्त बँका बंद. 
17 जून सोमवार- बकरीदनिमित्त निवडक राज्य वगळता देशभरातील बँका बंद. 
21 जून शुक्रवार- वटपौर्णिमेनिमित्त देशातील काही बँकांना रजा. 


हेसुद्धा वाचा : Monsoon In Kerala : ठरल्या मुहूर्ताआधीच मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी पोहोचणार? 


आठवडी सुट्टी आणि महत्त्वाचे दिवस पाहता जून महिन्यात जवळपास 12 दिवस बँका बंद राहतील. यामध्ये काही सुट्ट्या आठवडी सुट्टीला जोडूनच आल्यामुळं बँकांचा कारभार दीर्घ काळासाठी बंद राहण्याची चिन्हं आहेत. त्यामुळं बँकेत जाण्याआधी हे सुट्ट्यांचं वेळापत्रक पाहून घ्या.