Monsoon In Kerala : ठरल्या मुहूर्ताआधीच मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी पोहोचणार?

Monsoon In Kerala : प्रचंड उकाड्यापासून मिळणार दिलासा. कारण अखेर केरळमध्ये मान्सून दाखल. महाराष्ट्रात पोहोचण्यासाठीचा नवा मुहूर्त पाहून घ्या... 

May 30, 2024, 11:26 AM IST

Monsoon In Kerala : राजस्थान, दिल्लीमध्ये तापमानानं विक्रमी आकडा गाठलेला असतानाच महाराष्ट्रातही चित्र काही वेगळं नाही. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या उकाडा आणि दमट वातावरणात वाढ होताना दिसत आहे. 

1/8

Monsoon In Kerala

Monsoon arrives in kerala will reach maharashtra in next 10 days

Monsoon In Kerala : अंदमान निकोबार बेटांवर मान्सून दाखल झाल्या क्षणापासून तो केरळात आणि त्यानंतर महाराष्ट्रात कधी पोहोचणार याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती.   

2/8

मान्सून

Monsoon arrives in kerala will reach maharashtra in next 10 days

देशाच्या अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होत असतानाच आता मात्र हे चित्र फार काळ टीकून राहणार नाही, कारण, मान्सून केरळपर्यंत पोहोचला आहे. 

3/8

नैऋत्य मोसमी वारे

Monsoon arrives in kerala will reach maharashtra in next 10 days

हवामान विभागानं नुकत्याच जाहीर केलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी पावसाने अर्थात मान्सूननं केरळमध्ये प्रवेश केला आहे. फक्त केरळच नव्हे, तर 30 मे 2024 रोजी ईशान्य भारताच्या बहुतांश भागातही प्रवेश केला आहे.   

4/8

मुहूर्ताआधीच दाखल

Monsoon arrives in kerala will reach maharashtra in next 10 days

मान्सून केरळात दाखल होण्यासाठी आयएमडीनं 31 मे ही संभाव्य तारीख असल्याचं सांगितलं होतं. पण, यंदाच्या वर्षी हे मोसमी वारे ठरल्या मुहूर्ताआधीच केरळमध्ये दाखल झाल्यानं अनेकांनीच आनंद व्यक्त केला आहे.   

5/8

मान्सूनचा वेग

Monsoon arrives in kerala will reach maharashtra in next 10 days

मान्सूनची एकंदर वाटचाल आणि त्याचा वेग पाहता आता तो महाराष्ट्रात पुढील 10 दिवसांमध्ये दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रेमल चक्रीवादळ इशान्येकडे सरकलं होतं. ज्यामुळं बंगालच्या उपसागरामध्ये मोसमी वाऱ्यांचा जोर समाधानकारक होता. 

6/8

ढगांची दाटी

Monsoon arrives in kerala will reach maharashtra in next 10 days

केरळच्या दिशेनं येणाऱ्या मोसमी वाऱ्यांवर रेमल चक्रीवादळाचा परिणाम होण्याची चिंता प्राथमिक स्वरुपात व्यक्त करण्यात आली होती. पण, प्रत्यक्षात मात्र तसं काही होताना दिसलं नाही ज्यामुळं हे वारे केरळमध्ये पोहोचले असून, केरळपासून कर्नाटकपर्यंत ढगांची दाटी पाहायला मिळत आहे.   

7/8

90 ते 100 मिमी पावसाची नोंद

Monsoon arrives in kerala will reach maharashtra in next 10 days

मागील 24 तासांमध्ये केरळमध्ये 90 ते 100 मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून काही भागांमध्ये पूरसदृश परिस्थितीसुद्धा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, केरळातील या पावसाचा थेट महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही. 

8/8

सामान्यहून अधिक

Monsoon arrives in kerala will reach maharashtra in next 10 days

मान्सून टप्प्याटप्प्यानं पश्चिम किनारपट्टीवरून पुढे सरकणार असून, किमान आठवडाभर आणि कमाल 10 दिवसांच्या फरकानं तो महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. जून महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा तुलनेनं काहीसा कमी असला तरीही संपूर्ण मोसमात मात्र तो सामान्यहून अधिक असेल असाच हवामान विभागाचा अंदाज आहे.