मे महिन्यांत १२ दिवस बँक बंद राहणार
मे महिन्यातील संपूर्ण यादी
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. ३ मे रोजी संपणारा लॉकडाऊन २ आठवडे आणखी वाढवून १७ मेपर्यंत करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. यामध्ये बँकांचा देखील समावेश आहे. असं असलं तरीही बँकांमधील काही अत्यावश्यक काम असतील तर ते लवकर करून घ्या. कारण मे महिन्यात १२ दिवस बँका बंद राहणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. या १२ दिवसांच्या सुट्यांमध्ये दुसरा आणि चौथ शनिवारसह रविवारचा देखील समावेश आहे.
या दिवशी बँका राहणार बंद
३ मे - रविवार असल्याने बँका बंद राहणार
७ मे - बेलापूर, मुंबई, नागपूर, पणजी, पाटणा, तिरूवनंतपूरम, कोलकाता, कोची, इंफाल, हैद्राबाद, गुवाहाटी, चेन्नई, बंगळुरू या ठिकाणी बुद्धपौर्णिमेनिमित्त बँका बंद राहणार आहेत.
८ मे - कोलकातामध्ये रविंद्रनाथ टागो यांच्या जयंतीनिमित्त बँका बंद राहणार.
९ मे - दुसरा शनिवार असल्याने बँका बंद राहणार
१० मे - रविवार असल्याने बँका बंद राहणार
१७ मे - रविवार असल्याने बँका बंद राहणार
२१ मे - जम्मू, श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार
२२ मे - जम्मू, श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार
२३ मे - चौथा शनिवार असल्यामुळे बँका बंद राहणार
२४ मे - रविवार असल्याने बँका बंद राहणार
२५ मे - रमजान ईद असल्यामुळे बँका बंद राहणार
३१ मे - रविवार असल्याने बँका बंद राहणार