Bank Holiday: ऑक्टोंबरच्या पुढच्या 15 दिवसात इतक्या दिवस बँका बंद राहणार,जाणून घ्या सुट्ट्यांची यादी
बँकेची कामे आताच उकरून घ्या, पुढील 15 दिवसात इतक्या दिवस बँका बंद
मुंबई : ऑक्टोबरचा अर्धा महिना उलटला आहे. आता महिना संपायला अवघे 15 दिवस उरले आहेत. या येत्या 15 दिवसात 10 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे जर तुमची बँकेची कामे पेडींग राहिली असतील, तर आताच उरकून घ्या. अन्यथा तुमची बँकेची कामे खोळंबण्याची शक्यता आहे. दरम्यान आता येत्या 15 दिवसात कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत, हे जाणून घेऊयात.
ऑक्टोबर महिना हा सणासुदीचा महिना असतो. या महिन्यात अनेक सण येत असल्याने अधिकतर दिवस बँका बंद असतात. येत्या काही दिवसांत देशात दिवाळीपासून गोवर्धन पूजा आणि भाऊबीजपर्यंतचे सण साजरे होणार आहेत. यानिमित्त बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असतील तर ती त्वरित करून घ्या.
हे ही वाचा : सोने खरेदीदारांना दिलासा! दिवाळीआधी इतक्या रूपयांनी स्वस्त झालं Gold- Silver
रिझर्व्ह बँकेच्या 15 ऑक्टोबरनंतरच्या सुट्टीचे कॅलेंडर पाहिल्यास दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊ बीजच्या निमित्ताने बँका बंद राहणार आहेत. तथापि, बँकांच्या सुट्ट्या राज्ये आणि शहरांमध्ये भिन्न असतात. अनेक राज्यांतील प्रमुख सणांच्या दिवशी फक्त त्या राज्यांतील बँकांना सुट्टी असते. त्यामुळे कोणत्या राज्यात कशी सुट्टी असणार आहेत हे जाणून घेऊयात.
'या' दिवशी बँका बंद राहणार
- 16 ऑक्टोबर : रविवार
- 18 ऑक्टोबर: काटी बिहू (आसाम राज्य)
- 22 ऑक्टोबर चौथा शनिवार
- 23 ऑक्टोबर : रविवार
- 24 ऑक्टोबर : नरक चतुर्दशी (मणिपुर, सिक्किम आणि तेलंगणा वगळता इतर राज्यात सुट्टी)
- 25 ऑक्टोबर : गोवर्धन पूजा (मणिपुर, सिक्किम, तेलंगणा आणि राजस्थान)
- 26 ऑक्टोबर भाऊबीज (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, सिक्कीम, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि हिमाचल प्रदेश)
- (गंगटोक, इंफाळ, कानपूर आणि लखनौ)
- 27 ऑक्टोबर लक्ष्मी पुजन (मणिपुर, सिक्किम, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश)
- 30 ऑक्टोबर रविवार
- 31 ऑक्टोबर सरदार वल्लभभाई पटेल जयंती (रांची, पाटणा आणि अहमदाबाद)
वरील सुट्या पाहून तुम्हाला तुमच्या बँकेची कामे करता येणार आहेत. त्यामुळे आताच नियोजन करून बँकेची कामे उरकून घ्या.