Bank Holidays 2025: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बँका सुरू राहणार की बंद?
Bank Holidays 2025: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बँकांची कामं काढलीयेत? आधी बँकांचं वेळापत्रक पाहा आणि मगच घराबाहेर पडा...
Bank Holidays 2025: 2024 या वर्षाला मागे सारत आता सर्वजण नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. नवं वर्ष, नवा संकप्ल आणि याच नव्या वर्षासोबत काही नवी कामंही पूर्णत्वास नेण्याचा निर्धार अनेकांनीच केला आहे. या कामांमध्ये काहींच्या ताटकळलेल्या बँक व्यवहारांचाही समावेश असेल. पण, वर्षाच्या पहिल्याच दिवशी अर्थात 1 जानेवारी 2025 रोजी बँकेत जाऊन काही कामं मार्गी लावण्याचा बेत असेल तर आधी ही माहिती पाहा.
उपलब्ध माहितीनुसार वर्षाचा पहिल्याच दिवस असला तरीही 1 जानेवारी 2025 रोजी देशातील सर्व बँका सरसकट बंद राहणार नाहीत. थोडक्यात काही राज्यांमध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवशीसुद्धा बँका सुरूच राहणार आहेत, काही बँका मात्र या दिवशी बंद राहतील. त्यामुळं आपल्या बँकेच्या दूरध्वनी क्रमांकापासून अॅप किंवा टेक्स्ट मेसेजमध्ये त्यासंदर्भातील कोणतंही नवं Notification आलं आहे का, एकदा तपासून घ्या.
हेसुद्धा वाचा : Instagram, You Tube व्हिडीओतून कमाई करायच्या विचारात आहात? कुठे मिळतो बक्कळ पैसा?
बँक कर्मचाऱ्यांवर सुट्ट्यांची बरसात
जानेवारी 2025 मध्ये बँक कर्मचाऱ्यांना जवळपास 15 सुट्ट्या आहेत. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या आठवडी सुट्ट्यांसमवेत काही खास दिवसांचाही समावेश आहे. पाहा जानेवारील महिन्यातील सुट्ट्यांची यादी....
1 जानेवारी- नववर्ष/ देशातील बहुतांश राज्यात बँका बंद
5 जानेवारी- रविवार
11 जानेवारी- दुसरा शनिवार
12 जानेवारी- रविवार/ स्वामी विवेकानंद जयंती
14 जानेवारी- मकर संक्रांत/ पोंगल निमित्तानं आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणामध्ये बँका बंद
15 जानेवारी - तिरुवल्लुवर दिवस, माघ बिहू आणि संक्रांतीनिमित्त तामिळनाडू, आसाम आणि इतर राज्यांमध्ये बँका बंद
16 जानेवारी - उज्जावर तिरुनल/ तामिळनाडूतील बँका बंद
19 जानेवारी - रविवार / आठवडी सुट्टी
22 जानेवारी- इमोइन/ मणिपूरमध्ये बँकांना रजा
23 जानेवारी- नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती/ मणिपुर, ओडिशा, पंजाब, सिक्किम, पश्चिम बंगाल, जम्मू-कश्मीर आणि दिल्ली
25 जानेवारी- चौथा शनिवार
26 जानेवारी- प्रजासत्ताक दिन
30 जानेवारी - सोनम लोसर/ सिक्किममध्ये रजा